✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

पुसद – रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र वाहिनीचे विदर्भ उपसंपादक तथा दैनिक सुवर्ण महाराष्ट्र पुसद तालुका प्रतिनिधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव प्रज्ञापर्व समिती पुसद 2025 चे कार्याध्यक्ष , अन्याय अत्याचार निर्मूलन समिती यवतमाळ जिल्हाध्यक्ष, नुकत्याच संपन्न झालेल्या धम्म परिषदेत महाबोधी संस्थेचा धम्मभूषण पुरस्कार प्राप्त असे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विविध पुरस्काराने सन्मानित आयु. राजेश ढोले यांना ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था महाराष्ट्र नाशिक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कारासाठी विदर्भातून निवड करण्यात आली आहे.

सदर पुरस्कार दिनांक 24 मार्च 2026 रोजी रोटरी क्लब सभागृह, गंजमाळ नाशिक महाराष्ट्र राज्य या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे तरी सहकुटुंब सह मित्रपरिवार उपस्थित राहण्याचे कळविले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार मिळाल्याने कौटुंबिक व मित्रमंडळी तथा सहकारी यांच्या वतीने सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.







