✍️ राहुल पाईकराव (तालुका प्रतिनिधी उमरखेड)

नागापूर (रुपाळा)दि. 26-3-2026 रोजी सायंकाळी 7 वाजता नागापूर (रूपाळा)येथे महान राजे सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात आली. सम्राट अशोक हे आपल्या भारतातील मौर्य वंशाचे एक अत्यंत पराक्रमी आणि कल्याणकारी राजे होते. कलिंग युद्धातील रक्तपात पाहून त्यांनी युद्धनीती सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार केला.”धम्म”नैतिकता, अहिंसा या मार्गाने राज्य केले. सम्राट अशोकांनी जगभरात बौद्ध धर्माचा प्रसार केला.


मानवता सोबत त्यांनीं प्राण्यासाठीही रुग्णालय स्थापन केली. प्रजा कल्याणासाठी रस्ते, झाडे विहिरी, विश्राम गृहे बांधली. त्यांनी बौद्ध भिक्षीसाठी 84 हजार बौद्ध स्तूप बांधले. तसेच बौद्ध भिक्षू साठी विहार निवासस्थान यांची स्थापना केली. त्यांनी सर्व धर्माचा आदर केला. त्यांनी धम्मा अंतर्गत नैतिक वर्तन आई-वडिलांची सेवा, सत्य, अहिंसा पाळण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. नंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

तसेच चिरंजीव प्रताप राहुल पाईकराव यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित गावातील मान्यवर सदानंद तोडाशे, राजू सुरोशे, कैलास कदम, भीमराव राठोड, मोहसीन पठाण, मेहबूब पठाण, स्वप्निल बडेराव, अनिल हरणे, सिद्धार्थ कोल्हे, राष्ट्रपाल ठोके, राहुल पाटील, सुनील खंदारे, जनार्दन चौरे, संदेश मेश्राम, राष्ट्रपाल पाईकराव, ज्ञानेश्वर आमटे, या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार/ग्रा.पं. सदस्य राहुल पाईकराव यांनी केले.







