
🚨 (कुंभकर्णी झोपेचे सोंग घेणाऱ्या पोलिसांना खडबरून जागे करण्यासाठी शेकडो महिलांचा बिटरगाव (बु) पोलीस स्टेशन ला मोर्चा धडकला)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

बिटरगाव ( बु ) पोलीस स्टेशन बीट मध्ये खुलेआम देशी, विदेशी, बिअर, बनावट हतबभट्टी दारू दुकाने लावून विक्री केली जात आहे.वरळी मटका व 52 पत्त्या चा जुगार सुद्धा बिनधोक सुरु आहेत.बिटरगाव ( बु ) या गावात पोलीस स्टेशन असून ही गावात ऐकणंदरीत साथ देशी विदेशी विक्री दुकाने आहेत. तर वरळी मटका दुकाने 4 आहेत.

सोबतच पिंपळगाव ( वन ), जेवली, येकंबा ( वन ), मोरचंडी, मुरली, आकोली, करंजी या गावांमध्ये खुललेआम दुकाने लावून अवैद्य धंदे सुरू आहेत. त्यामुळे महिलांचे संसार उध्वस्त होऊन मूलं बाळ भिकला लागले आहेत. तरुण पिढी व विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असून भावी पिढी बरबाद होत आहे.ना विलाजी महिलां पोलीस स्टेशन ला येऊन लेखी तक्रार देतात पण बिट जमादार साहेब महिलां च्या समाधानी साठी दारू विक्रेत्यांवर थातूर – मुतूर कार्यवाही करून मोकळे होतात. पुन्हा दारू विक्रेते जोमाने धंदे करतात. असा सिलसिला बिटरगाव पोलीस स्टेशन चा सुरु असल्यामुळे महिलांनी न्याय कोन्हाकडे मागावा हा गंभिर व सर्वात मोठा प्रश्न आंदोलन करणाऱ्या शेकडो महिलांना पडला आहे.वरळी मटका आणि 52 पत्त्याचा जुगार, दारू विक्रेत्यांची दादागिरी वाढली असून तक्रार कर्त्या महिलांना जीवे मारून टाकतो अश्या धमक्या ही दिल्या जात आहेत. त्या मुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिटरगाव ( बु ) मधील दुकानचे लोकेशन :- बस स्टॉप ला लागून दारू व वरळी मटका दुकान, बिटरगाव ते जेवली रोड ला लागून देशी, विदेशी विक्री दुकान, बिटरगाव जेवली रोडवर रसवंती च्या नावावर दारू चे दुकान, कब्रस्तान कडे जाणाऱ्या रस्त्याला लागून देशी विदेशी दारू विक्री दुकान, बिटरगाव ते मन्याळी रोड ला लागून नरडे, पापड, उकडलेली अंडे, आल्लू भजे चा दुकानात देशी व विदेशी दारू खुल्लेआम बिनधास्त विक्री केली जात आहे. हे सर्व माहित असून सुद्धा बिट आमलदार साहेब कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन स्वतःचा खिसा गरम करून घेत आहेत व आमचे संसार देशधडीला लावत आहेत.असा आरोप जन आंदोलन करणाऱ्या महिलांनी स्पष्ट भाषेत केला आहे.

मागील तीन महिन्यापूर्वी अवैध धंदे बंद करा म्हणून महिलांनी पोलीस स्टेशनला मोर्चा नेला होता. लेखी तक्रार ही दिली होती. त्या वेळेस स्वतः ठाणेदार शिंदे साहेबांनी ऐका महिन्यात सर्व अवैध धंदे बंद करून टाकतो असे आस्वान आंदोलन करत्या महिलांन समोर केले होते.

परंतु अजूनही दुकाने बंद झाले नाहीत म्हणून संतप्त महिलांनी आज दि.22 जून 2026 सोमवार रोजी पुन्हा 300 हुन अधिक महिलांच्या स्वाक्षऱ्या घेऊन व स्वतः पोलीस स्टेशन ला येऊन लेखी तक्रार दिली आहे. व बिट जमादार साहेबांच्या आशीर्वादाने बिटरगाव ( बु ) बिट मधील अवैद्य धंदे सात दिवसाच्या आत बंद झाले नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करणार असा इशारा आंदोलनकर्त्या संतप्त महिलांनी दिला आहे.







