
यवतमाळ विधानसभा,राळेगाव विधानसभा,वणी विधानसभा,आर्णी-केळापूर, विधानसभा,दारव्हा-दिग्रस विधानसभा,पुसद विधानसभा, उमरखेड महागाव विधानसभा.
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
यवतमाळ (दिनांक 23 नोव्हेंबर) यवतमाळ मागिल एक महिण्यापासुन सुरु असलेली विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी २० नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदानाने संपली. मात्र कोण निवडून नेणार गाबाबत संपुर्ण राज्यभर व जिल्हाभर लागलेली उत्सुकता ज्या दिनांक २३ नोव्हेंबरला दुपारपर्यंत संपणार आहे. निवडणूकीत कोणाचे पारडे जड असणार किया विजयाचा कल कुणाकडे झुकला गेला आहे. हे दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत जवळपास कळणार आहे.

सध्या संपूर्ण जिल्ह्यासह त्या-त्या मतदारसंघातील मतदारांची आपल्या मतदारसंघातून कोण निवडून येणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आ. मदन येरावार विरुद्ध महाविकास आघाडीचे बाळासाहेब मांगुळकर यांच्यातच खरी लढत झाली आहे. यामध्ये बाळासाहेब मांगुळकर बहुमताने विनगी होण्याची दाट शक्यता आहे. मतदारसंघात रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार सर्व मिळून १५ ते २० हजार मतदान घेण्याची शक्यता आहे.
राळेगाव विधानसभा मतदारसंघात महागृतीचे आ.डॉ. अशोक उईके विरुध्द महाविकास आघाडीचे माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्यात सरळ लढत झाली आहे.निवडणूक निकालात प्रा. बसंत पुरके सर यावेळी बाजी मारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वणी विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले होते. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत महायुतीचे आ. संजिव रेड्डी बोदकुरवार व महाविकास आघाडीचे संजय देरकर यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. यामध्ये संजय देरकर विजयी होण्याची चिन्हे दिसत आहे. येथे मनसेचे राजू उंबरकर आणि काँग्रेसचे बंडखोर संजय खाडे यांच्यात तिसऱ्याक्रमांकासाठी लढत होत आहे.


आर्णी -केळापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे जितेंद्र शिवाजीराव मोघे विरुध्द महायुतीचे राजू तोडसाम यांच्यात सरळ लढत झाली.येथील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून मतमोजनीत कोण बागी मारेल, याचा अंदाज लावणे अशक्य झाले आहे. मात्र दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाचे दावे, प्रतिदावे करण्यात येत आहे,

दिग्रस-दारव्हा मतदारसंघामधील निवडणूक प्रबंड लक्षवेधक तरली आहे.येथे चार वेळा निवडून आलेल्या महायुतीचे संजय राठोड यांच्याविरुध्द महाविकास आघाडीचे काँग्रेसचे मा. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे रिंगणात होते. या दोघांमध्ये सुग्दा अत्यंत चुरशीची लढत झाली आहे.उद्याच्या मतमोजनीत माणिकराव ठाकरे बाजी मारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुसद विधानसभा मतदारसंघात महायुतीचे इंद्रनिल नाईक विरुध्द महाविकास आघाडीचे शरद मैद यांच्यात मुख्य लढत झाली. यामध्ये इंद्रनिल नाईक बाजी मारणारतील तर येथे अपक्ष रिंगणात असलेले माधव वैद्य बऱ्यापैकी मतदान घेण्याची शक्यता आहे.

उमरखेड महागाव विधानसभा मध्ये सुरुवातीला चौरंगी लडतीचे चित्र होते, महाविकास आघाडीचे साहेबराव कांबळे व महायुतीचे किसनराव वानखेडे यांच्यात मुख्य लडत आहे.दोन्ही उमेदवार माजी आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे या दोन्ही मुख्य उमेदवारांना दोन्ही बंडखोरी मतांचा फटका बसणार आहे.आजच्या मतमोजनीत येथून साहेबराव कांबळे विजयाची माळ गळ्यात घालणारच आहे असा असं सर्व जनतेच्या मत वर्तविले जात आहे.



