
✒️ शाम भाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466


यवतमाळ:– (दिनांक 27 नोव्हेंबर) जिल्ह्यातील उमरखेड येथील तालुका कृषी कार्यालय येथे अनेक वर्षापासून कार्यरत श्री.उत्तम जानकर (कृषी मंडळ अधिकारी) हे शासकीय कर्मचारी सेवा व शिस्त नियमाने उमरखेड येथे दीर्घकाळ पासून नियमबाह्य एकाच कार्यालयात कार्यरत आहे.ही बाब शासकीय कर्मचारी सेवा शिस्त नियमाने भंग करणारी आहे.

या बाबीकडे जिल्हा प्रशासकीय यंत्रणा का व कशामुळे सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.प्रशासकीय सेवाकाळ हा कर्मचारी निश्चित कालावधी असून देखील सदर कर्मचाऱ्याला प्रशासकीय सेवा बदली निकष अध्याप पावतो. का? लागू करण्यात आला नाही व इतरत्र बदली का? झाली नाही.

याची देखील वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून विभागीय खातेनिहाय चौकशी करावी.अशा प्रमुख मागणी तक्रार जिल्हा कृषी अधिकारी यांना प्रत्यक्ष वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र यवतमाळ येथे तक्रार अर्ज देण्यात आला आहे. आणि संबंधित अधिकारी यांच्या पर्सनल व्हाट्सअप अकाउंट वरही सेंड करण्यात आलेली आहे.

जिल्हा कृषी अधिकारी या बाबीची गंभीर दखल का घेत नाहीत. त्यामुळे शंकाबळात असून त्यांना पाठीशी सातत्याने घालण्याचा प्रयत्न होत आहे असे निदर्शनात येत आहे.

तरी वरील बाबीचे गंभीरतापूर्वक दखल घेऊन श्री. उत्तम जानकर यांची तात्काळ बदली इतरत्र करावी. अशी तक्रार शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना) यवतमाळ यांनी केली आहे.

अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल हा इशारा तथा निवेदन सादर होणाऱ्या गंभीर परिणामास जिल्हा कार्यालय कृषी कार्यालय हेच जबाबदार राहील.असा इशाराही देण्यात आला.


तसेच माहितीस्तव तालुका कृषी अधिकारी उमरखेड यांना आवश्यक कारवाई साठी सविनय तक्रार निवेदन सादर करण्यात आले.


