
(विविध ठिकाणी जन्मदिवस साजरा)
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️सिद्धार्थ दिवेकर (कार्यकारी) संपादक मो.9823995466
उमरखेड:- दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता उमरखेड शहरातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निर्भिड पत्रकार तथा शहराध्यक्ष भीम टायगर सेना, बौद्ध स्मशानभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष, जनहित 24 न्यूज चे कार्यकारी संपादक, महाराष्ट्र वायरल न्यूज चैनल चे सहसंपादक, दैनिक सचित्र न्यूज तालुका प्रतिनिधी, मा.सिद्धार्थ दिवेकर यांचा मित्रमंडळी कडून वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला.

सिद्धार्थ दिवेकर यांनी फुले शाहू आंबेडकर चळवळीचे काम अनेक वर्षापासून करण्यास सुरुवात केली होती.मागील पंधरा वर्षापासून भिम टायगर सेना या सामाजिक संघटनेमध्ये काम करून अन्याय विरुद्ध वाचा फोडण्याकरिता पत्रकारिता क्षेत्रांमध्ये पाऊल टाकले.


आणि आपली पत्रकार क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून गोरगरीब शेतकरी यांची व्यथा आपल्या वृत्तपत्रांमध्ये छापून गोरगरिब शेतकऱ्यांना मदत करण्याचे मोठे कार्य केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधून दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थ दिवेकर यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली करण्यात येत असतात.

यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोटरसायकल रॅली, धम्मचक्र प्रवर्तन दिन,भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि ६ डिसेंबर “महापरिनिर्वाण दिनी” कॅन्डल मार्च रॅली काढण्यात सामाजिक एकता जोपासण्याचे कार्य करत असतात. या सर्व कार्याचा पाठपुरावा करून उमरखेड तालुक्यातील समाज बांधव यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निर्भीड व निस्वार्थ पत्रकार तथा शहराध्यक्ष भीम टायगर सेना सिद्धार्थ दिवेकर यांचा मोठ्या आनंदात वाढदिवस साजरा करण्यात आला.
तसेच व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडिया मार्फत सिद्धार्थ दिवेकर यांच्यावर वाढदिवसाच्या दिनी शुभेच्छांचा वर्षाव झालेला दिसत आला.
यावरून असं लक्षात येते की सिद्धार्थ दिवेकर हे उमरखेड शहर नव्हे तर तालुक्यात प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेले आढळून येतात. त्यांना पुन्हा एकदा समाज बांधवांच्या वतीने तसेच महाराष्ट्र वायरल न्यूज चैनल च्या वतीने वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा…! देऊन वाढदिवस साजरा केला .

महाराष्ट्र वायरल न्यूज चैनल चे उपसंपादक तथा जनहित 24 न्यूज चे कार्यकारी संपादक सिद्धार्थ दिवेकर यांचा दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ वाढदिवस साजरा करण्यात आला होता.

याप्रसंगी आझाद समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा भिमशाहीर देवानंद पाईकराव यांनी पत्रकारितून एक आपली ओळख निर्माण करणारे सक्रिय असे कार्यकर्ते गोरगरिबाच्या मदतीला सदैव तत्पर्य धावून येणारे असे आमचे मित्र सिद्धार्थ दिवेकर यांना शुभेच्छा दिल्या.ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते आयुब पठाण यांनी सिद्धार्थ दिवेकर यांच्या कार्याची दखल घेऊन निळी शाल आणि पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केला.

तसेच पठाण यांनी कौतुकपर शब्दरूपी वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्यात.
सिध्दार्थ दिवेकर यांनी उपस्थित सर्वांचे धन्यवाद व आभार व्यक्त केले.

यावेळी श्यामभाऊ धुळे (पत्रकार तथा संपादक जनहित 24 न्यूज चॅनलचे संपादक), बबलू भालेराव (महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलचे मुख्य संपादक), सुशील आढागळे (सामाजिक कार्यकर्ते), गौतम नवसागरे (तालुका अध्यक्ष रिपब्लिकन युवा सेना), पत्रकार शुद्धोधन दिवेकर, देवभाऊ पाईकराव, आडे, होलगिरे इत्यादी कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा केला.

सायंकाळी 7:00 वाजताभारत सायकल स्टोअर चे मालक वीरभाऊ खंदारे, भारत खंदारे माजी नप सभापती, कविता पोपरवाड मॅडम यांनी सुद्धा पुष्पहार आणि झाडाचे रोपटे देऊन सिद्धार्थ दिवेकर यांचा वाढदिवस साजरा केला.

कैलास वाहुले साहेब पं.स कर्मचारी आणि धोंगडे साहेब सामाजिक कार्यकर्ते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा केला.


यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार समोर आकाश श्रवले यांनी सिद्धार्थ दिवेकर यांचा वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले होते.

रमामाता महिला मंडळ च्या अध्यक्षा यांच्यासह अनेक महिला व तरुण नवयुवक यांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदाने वाढदिवस साजरा करण्यात आला…!


यावेळी प्रफुल दिवेकर, आकाश श्रवले, रमामाता महिला मंडळाचे अध्यक्ष उषाताई इंगोले, यशोधरा धबाले, जानकाबाई इंगोले, सरवदे बाई, शांताबाई दिवेकर,आनंदाबाई दिवेकर, मधुबाला दिवेकर, आकाश पाईकराव, छोटूभाऊ दिवेकर, नितीन आठवले, ऋषिकेश पाईकराव, आदित्य खिल्लारे यांच्यासह अनेक तरुण वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता.





