
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक १२ डिसेंबर) परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय संविधानचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारका समोरील असलेले भारतीय संविधानाची प्रतिकृती संविधान पुतळ्याची एका समाजकंटकाने नासधुस आणि तोडफोड केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला जात आहे.


आज उमरखेड शहरामध्ये परभणी येथील घटनेचा भिम टायगर सेना सामाजिक संघटना आज भीम आर्मी / आझाद समाज पार्टी (राजकीय पक्ष), रिपब्लिकन युवा सेना वंचित बहुजन आघाडी व समाज बांधवांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत पायी चालत आपापल्या परीने निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदविला आहे.

सदर समाजकंटकाला कायदेशीर व कठोर कार्यवाही करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा द्यावी. या प्रमुख मागणी यावेळी केली आहे.


चौकट:- दिनांक १३ डिसेंबर रोजी सकाळी ११:३०मी उमरखेड शहरात निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रॅलीमध्ये सर्व संविधान प्रेमी आंबेडकरवादी तरुण बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान यावेळी केले आहे.

यावेळी शामभाऊ धुळे, (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ), करण भरणे सर जिल्हा उपाध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ, कैलास कदम तालुका अध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड, सिध्दार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड), जॉन्टी विनकरे (जिल्हाध्यक्ष आजाद समाज पार्टी यवतमाळ),

देवानंद पाईकराव (तालुका अध्यक्ष आजाद समाज पार्टी उमरखेड) प्रफुल दिवेकर (शहराध्यक्ष आजाद समाज पार्टी उमरखेड), सुनील पाटील चिंचोलकर (जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन युवा सेना यवतमाळ), गौतम नवसागरे (तालुकाध्यक्ष रिपब्लिकन युवा सेना), शुद्धोधन दिवेकर (शहराध्यक्ष रिपब्लिकन युवासेना उमरखेड), संबोधी गायकवाड (तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी),


डॉ. आयुब पठाण,संदीप विनकरे, विनोद बरडे, वीरेंद्र खंदारे, प्रेम हानवते, सुभाष बरडे, दत्ता शिनगारे, शाहिद भाई,चंदू वाठोरे, सुशील आढागळे, आकाश श्रवले, सचिन वाहुळे, रवी पडघने, आंबेडकरी पक्ष संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.





