
(रवींद्रभाऊ वाठोरे मित्र मंडळाने या कार्यक्रमाचे केले आयोजन)
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक २० जानेवारी) शहरातील माहेश्वरी खुलेनाट्यगृह येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजक करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून प्रा. अविनाश नाईक यांच्या “यशोगाथा महासूर्याची” ऑर्केस्ट्रा संचाकडून वंदनगीत जाऊन सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ.अनिल काळबांडे, वीरेंद्र खंदारे सामाजिक कार्यकर्ते, सिद्धार्थ दिवेकर पत्रकार तथा शहराध्यक्ष भीम टायगर सेना, भीमराव सोनुले प्रा. डॉ.धनराज तायडे हे होते.






प्राध्यापक अविनाश नाईक यांच्यासह संचातील सर्वच टीमचा आयोजकांच्या हस्ते तसेच रमामाता महिला मंडळ, साखरा येथील महिला मंडळ, आणि बोरबन मधील महिलांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. सन्मान धनराज तायडे यांनी परदेशात एमबीबीएस पास केल्याबद्दल मान्यवरांच्या व आयोजकांच्या हस्ते पुष्पहार व पुष्पगुच्छ सन्मान करण्यात आला.

अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आनंदमय वातावरणामध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला आहे. यावेळी उमरखेड शहर व तालुक्यातील शेकरू नागरिकांनी या कार्यक्रम पाहण्याकरिता गर्दी केली होती.

या कार्यक्रमाचे आयोजक रवींद्रभाऊ वाठोरे मित्र मंडळ, सुमेध बोधी युवा मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड यांनी केले होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रवींद्र वाठोरे,आकाश लोणकर,अमोल मंडाले,मनोज काळे सर, किरण गडदने इत्यादींनी अथांग परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्राध्यापक गजानन दामोदर यांनी केले.


