✍🏻शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)


उमरखेड:- (दिनांक 18 मार्च) तालुक्यातील अवैध धंदे जुगार, मटका, दारु, गुटखा, रेती, अवैध मुरुम त्वरीत बंद करणे अशी तक्रार केली होती, पण तात्पुरते बंद करुन ते पुन्हा खुलेआम सुरु करण्यात आले असल्यामुळे ते त्वरीत कायमस्वरुपी बंद यावे.

यामुळे तालुक्यातील अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत चोरीचे प्रमाण वाढले आहे गुन्हेगारी मध्ये वाढ झाली आहे. जुगार व मटक्यासाठी घराघरांमध्ये वाद निर्माण झाले आहे. म्हणून नागरिकांची जनभावना लक्षात घेऊन अशी तक्रार शाम धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भिम टायगर सेना) यांनी केली होती. पण हे अवैध धंदे हे तात्पुरते बंद करुन खोटे आश्वासन लेखीपत्र देवून सदर आमरण उपोषण मागे घेण्यात भाग पाडले होते.
तरी सुध्दा आज मोठया प्रमाणावर अवैध धंदे तालुक्यात मोठ्या प्रमाणात जुगाराचे अड्डे (१) हरदडा फाटा, (२) कारखेड फाटा, (३) बेलखेड पांदन रोड तसेच उमरखेड शहरातीलइंदिरा नगर या ठिकाणावर मोठया प्रमाणात खुलेआम जुगार अड्डे निर्माण करण्यात आले आहेत. त्या बरोबरच शहर व तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री होत आहे.

चौकट:- तसेच मुंशी दिनेश चव्हाण व त्यांचे खबरीदाराच्या माध्यमातून अवैध रेती, अवैध गुटखा, अवैध मुरुम पुरवठा करणाऱ्या लोकांकडुन मोठ्या प्रमाणात वर्दीचा धाक दाखसून पैश्याची वसुली सुरु आहे. या संबंधात तक्रार दाखल करुनही कोणतीच ठोस कार्यवाही झाली नाही. याबाबत मुंशी दिनेश चव्हाण यांचे कॉल डिटेक्ल्स चेक करण्यात यावे.
चौकट:- उमरखेड तालुक्यातील अवैध धंदे जुगार,मटका, दारू,गुटखा,रेती, अवैध मुरूम उत्खनन बंद न झाल्यामुळे दिनांक 24 मार्च रोजी आमरण उपोषणाला बसणार आहे. – शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ)

तरी मा. साहेबांनी त्वरीत कार्यवाही करुन अवैधरित्या सुरु असलेले सर्व धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी केली होती. पण कोणतीही कार्यवाही न झाल्याने मला आमरण उपोषण वेळ आली आहे.
असे लेखी निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या कार्यालयात देण्यात आले आहे.




