✍️शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव जिल्हा परिषद च्या रोड लगत शासकिय हद्द असून ही चाळीस संबंधित घरवाले नाली करून द्यायला तयार असतानाही एका काँग्रेसच्या नेत्यांनी JCB वाल्या रिपोर्ट देण्याची धमकी दिल्याने JCB काम करण्यास तयार नाही . मजुरांना पण धमक्या देत आहेत नाली खोदकामाला विरोध करणारांचे राजकिय वलय आहे भितीमुळे नाली खोदकाम करायला कोणी ही तयार नाही .

बापूराव कदम यांच्या घरासमोर सांडपाण्यामुळे अरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . पंधरावा वित्त आयोगातून नाली बांधकाम मंजूर आहे व शासकिय हद्दीत नाली खोदकाम होणार आहे .

विरोध करणाऱ्या संबधित नेत्याचे त्या ठिकाणी घर नाही व कुठलाही संबध नाही . ज्यांच्या घरासमोर नाली काम होत आहे त्यानी त्यांची हरकत नाही त्यानी नाली व्हावी यासाठी ग्राम पंचायतला रितसर अर्ज ही केवळ राजकारणासाठी विरोध करण्याचे काम व रिपोर्ट देण्याच्या धमक्या देण्याच काम होत संबंधित काँग्रेसचा नेत्याकडून होत आहे .

सरपंच सुनिता भोपळे , उपसरपंच रामेश्वर शिंदे , माधव कदम , विनायक कदम , सतिष भगत ह्यानी नाली खोदकाम हाती घेतले.
उपसरपंच रामेश्वर शिंदे म्हणाले नागरिकांच्या समस्या सोडवने ही आमची जबाबदारी आहे , पाणी साचल्या त्यामुळे अरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली , संबधित नाली करण्याची नागरीकांची मागणी आहे , तसा अर्ज आहे .

जर रिपोर्टच्या भीतीमुळे जेसीबी वाले किंवा मजूर येत नसतील तर आम्ही स्वतः नाली खतून देऊ . आमचे विरोधक बलाढय आहेत , त्याना राजकिय वलय आहे त्यामुळे JCB वाले मजुर भित आहेत म्हणुण मी व माझे सहकारी स्वतः नाली खोदत आहोत . नागरीकांच्या समस्या सोडवने आमची जबाबदारी आहे .



