
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड (दिनांक 30 मे) पोलीस ठाणे उमरखेड हद्दीमध्ये मारलेगाव फाटा येथे नाकाबंदी सुरू असताना ट्रक क्रमांक MH 38 D-2644 हा अवैध गोवंश भरून हदगाव दिशेला जात असताना नाकाबंदी सुरू आहे.


हे माहित झालेने व संशय आल्याने ट्रक ड्रायव्हरने ट्रक परत यू टर्न घेऊन उमरखेड दिशेने निघाला व पळून जात असताना पोलिस निरीक्षक पांचाळ, PSI श्री इंगळे व DB staff, DSB चे संतोष चव्हाण व स्टाफसह पाठलाग करून उमरखेड शहरातील नागचौकाचे अलिकडे पेशावर हॉटेलचे जवळ ट्रक ड्रायव्हरने ट्रक सोडून पळून गेला.त्यावेळी आम्ही सदरचा ट्रक दुसऱ्या ड्रायव्हरच्या मदतीने पोलीस ठाण्याला आणून गोवंश चेक केले व सदर गोवंश कारवाईच्या अनुषंगाने गजानन बाबा गोशाळा, कौठा हदगाव या ठिकाणी सोडण्यात आले आहे.सदर गोवंश वर्णन खालील प्रमाणे आहे.

काळया, पांढऱ्या, लालसर रंगाचे एकुण 40 गोऱे प्रति कि अं 15000/- रूपये एकुण 6,00,000/- (सहा लाख फक्त) रूपये व टाटा कंपनीचा ट्रक MH-38-D-2644 किं अ 10,00,000/- रू असा एकुण 16,00,000/- रूपये (सोळा लाख रुपये फक्त) चा मुद्देमाल उपरोक्त प्रमाणे अवैध गोवंश वाहतूक करताना मिळून आले असून पोलीस स्टेशन उमरखेड अप क्र 392/2025 कलम 11,11(1)(b),11(1)(m)11(f)11(1)(h)11(1)(k)11(1)(I) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, 9 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय श्री वानोळे हे करीत आहेत.


आरोपींना निष्पन्न करणेसाठी तपास सुरू आहे.



