✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

[सामाजिक कार्यकर्ते जर्रार अहेमद कुरेशी यांची मुस्लिम वेल्फेअर अससोसिएशच्या दारव्हा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती]

यवतमाळ / दारव्हा (दि.१/६ /२०२५) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष सलीमजी सारंग यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष युनूस शेख याच्या वाढदिवसाच्या औचित्याच्या निमित्ताने आर्णी येथे दारव्हा येथील सामाजिक कार्यकर्ते जर्रार अहेमद कुरेशी यांची मुस्लिम वेल्फेअर अससोसिएशच्या दारव्हा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती जिल्हाध्यक्ष युनूस शेख यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मुस्लिम वेल्फेअर अससोसिएशन जिल्हाध्यक्ष युनूस शेख यांचा वाढदिवस ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे रुग्णांना फळ वाटप करुन साजरा करण्यात आला,

व त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विश्रामगृ आर्णी येथे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला. वाढदिवसाचे औचित्य म्हणून त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी आपल्या संघटनेचे नियुक्ती पत्र देऊन संघटनेला जिल्ह्यात विस्तारण्या करीता दिशा दिली, व संघटनात्मक बांधणीची सुरवात केली.

आजच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमा करीता आवर्जून उपस्थित,पंचायत समितीचे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी किशोर रावते सर, महसूलचे सेवानिवृत्त बाबू के.के खान, ऍड जावेद शेख,फारुख धरिवाला, शब्बीर खान,पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अबीद फानन,पत्रकार अरिफ खान,पत्रकार रशीद मलनंस पत्रकर मनोज माघाडे,पत्रकार परवेज बेग, शकील शेख,पत्रकार प्रसाद जाधव,पत्रकार पूजा ढाले, पत्रकार रंजना आडे, नाना मेश्राम,अशोक सकवान,

व सोबतच मुस्लिम वेल्फेअर अससोसिएशनचे नवनिर्वाचित दारव्हा तालुका अध्यक्ष जरार अहेमद कुरेशी व रुग्णालयातील सर्वच कर्मचारी उपस्थित होते मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन यवतमाळ जिल्हाध्यक्ष हे सर्वधर्म समभाव जपणारे सामाजिक व्यक्तिमत्व आहे, ते सामाजिक कार्यात सदैव अग्रगन्य असतात व शहरातील सामाजिक ऐक्य जोपासने हा त्यांच्या स्थायी स्वभाव आहे,

राजकीय क्षेत्रात सगळ्यांशी मनमिळाऊ संबंध जपून आपली ओळख निर्माण केली आहे,आज त्यांच्या वाढदिवसा करीता सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते,त्यांचे नेहमीचेच एक बिद्र वाक्य राहिले आहे, न्यायची आवड, अन्यायाची चिड ही त्यांची काम करण्याची ओळख आहे.



