
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) ✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)

उमरखेड दि.01/06/2025 रोजी डि बी पथकाला गोपनिय बातमीदार मार्फत माहीती मिळाली की, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरखेड च्या पाठीमागील कॉलनीमध्ये एक इसम हा त्याचे घाव (चाकु) घेवुन जात आहे. अशी माहिती मिळाली आहे.

पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि पांडुरंग शिंदे, डी बी प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोना/73 संतोष राठोड, पोशि/1652 संघशील टेंभरे, पोशि/1191 निवृत्ती महाळनर, पोशि/928 प्रफुल घुसे, पोशि/1275 किरण राठोड, असे रवाना होवुन सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे असलेले शासकिय निवासस्थान मधील डांबरी रोडवर एक इसम जात असतांना आम्ही त्यास 12/00 वा थांबवुन आमचा तसेच पंचाचा परिचय देवुन त्यास येथे येण्याचे कारण समजावुन सांगुन त्यास त्याचे नाव,गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विनायक सायलु हाळदेवार, वय-20 वर्ष, रा.एम जी एम कॉलेज समोर बजरंग कॉलनी तरोडा बु ता.जि. नांदेड असे असल्याचे हेच संशयीत इसम असल्याचा खात्री झाल्याने आम्ही आमची व पंचाची अंगझडती घेवुन सदर आरोपीची अंगझडती घेतली, असता त्याचे कमरेला एक लाकडी मुठीचा व काळ्या रंगाची मॅन असलेला घाव (चाकु) लावुन दिसला.


सदर घाव त्याने पंचासमक्ष त्याचे जवळ मिळुन आला. त्याचे वर्णन खालील प्रमाणे 200/- रुपये एक लोखंडी घाव (चाकु) लाकडी मुठ असलेला ज्याची पात्याची लांबी 9.6 इंच, रुंदी 1.5 इंच, मुठीची लांबी 4.3 इंच, एकुण घावची (चाकु) लांबी 13.9 इंच, लाकडी मॅन ज्याला काळ्या रंगाचा टेप लावलेला ज्याची लांबी 10.2 इंच कि.अं 200/- रुपये वरील वर्णनाचा घाव अवैध व विनापरवाना आरोपी नामे विनायक सायलु हाळदेवार, वय-20 वर्ष, रा.एम जी एम कॉलेज समोर बजरंग कॉलनी तरोडा बु ता.जि. नांदेड यांचे जवळ मिळुन आल्याने नमुद पंचासमक्ष मोक्यावर जप्त करण्यात आले.यांचे विरुध्द शस्त्र अधिनीयम 1959 कलम 4/25 सह अप क्र.406/2025 प्रमाणे पोलीस स्टेशन उमरखेड येथे गुन्हा नोंदी सह कार्यवाही करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन उमरखेड जिल्हा हि अवैध धंदे शस्त्रे बाळगणारे प्रतिबंध असुन यापुढे यासंबंधी माहीती असल्यास सदरची माहीती जनतेने पोलीसाची कोणतीही भीती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती.

सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर अधिक्षक पीयुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग शिंदे पो.स्टे. उमरखेड डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोना/73 संतोष राठोड, पोशि/1652 संघशील टेंभरे, पोशि/1191 निवृत्ती महाळनर, पोशि/928 प्रफुल घुसे, पोशि/1275 किरण राठोड, पो.स्टे. उमरखेड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.



