
(एमपीजे ची आगार व्यवस्थापक व पोलीस निरिक्षक यांचे कडे मागणी)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड:- (दिनांक 22 ऑगस्ट) उमरखेड नांदेड रोड, लगत सवेरा कॉलोनी, फैजान कॉलोनी, रहीमनगर, शहाकॉलोनी, ताजपुरा वार्ड, राजेंद्र प्रसाद वार्ड, आंबेडकर वार्ड असे अनेक रहीवासी वार्ड असल्याने प्रवाशांचे सोयीसाठी बजाज शोरूम – रहीम नगर कडे जाणारा रस्ता या ठिकाणी बस थांबा अत्यंत आवश्यकताआहे. तसेच याठिकाणी दोन्ही बाजुने बस थांबविण्यासाठी भरपुर पण जागा आहे.


नांदेडकडे जातांना बजाज शोरूम समोर नांदेडकडुन येतांना रहीमनगर कडे जाण्याचा रस्ता समोर बस थांबा देवुन प्रवासी नागरीकांना सुविधा देण्याची मागणी मोमेंट फॉर पीस अँड जस्टीस या सामाजिक संघटनेच्या आपली समस्या आपला पुढाकार या मोहीमच्या माध्यमातून सर्व जवळपास राहणाऱ्या वसाहतीतील नागरिकांनी निवेदना व्दारे केली आहे.


निवेदन देतांना शेख असीम ,शेख सलीम,कलीम राज सवेरा कॉलोनी, शेख जाकिर राजेंद्र प्रसाद वार्ड,शेख मुमताज रहमान कॉलोनी,वसीम पठान रहीम नगर सह नांदेड रोड, लगत सवेरा कॉलोनी, फैजान कॉलोनी, रहीमनगर, शहा कॉलोनी, ताजपुरा वार्ड, राजेंद्र प्रसाद वार्ड, न आंबेडकर, वार्ड चे नागरिका सह एमपीजे चे कार्यकर्ते अध्यक्ष मोहसीन राज , डॉ फारूक अब्रार ,इरफान खान, सय्यद रजा ,अब्दुल जहीर मंसूरी ,समीर मुस्तफा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



