
“आपकी समस्या – आपकी पहल” कार्यक्रमा अंतर्गत एमपीजे ची मागणी

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड :- दि. १५ -१६ ऑगस्ट ला झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः फुलारी ले-आऊट, कोकडवार ले-आऊट, रहीम नगर, फातेमा कॉलनी, मुर्तजा नगर, इंदीरा नगर या भागांमध्ये घरामध्ये पाणी घुसून जीवनावश्यक वस्तू, घरेलू साहित्य, धान्य व इतर संपत्तीचे नुकसान झाले आहे.

तहसील कार्यालय मार्फत सर्वेक्षणाचे तातडीने व चांगले कार्य झाले परंतु काही वास्तविक नुकसान झालेल्या घरांचे सर्वेक्षण नाही.
मुव्हमेन्ट फॉर पिस ॲड जस्टीस संघटनेच्या कार्यकर्तांनी “आपली समस्या – आपला पुढाकार ” मोहीमेअंतर्गत नुकसानग्रस्तांचा सर्वे केले असता इंदीरा नगर मध्ये सलीम खान हसन खान ,हिना परविन रहीम मोगल ,शांताबाई घागरे,सोनी बाली पवार,कमरून बी शे रशिद सवेरा कॉलनी कॉलनी मध्ये शेख हसन ,शे जाकीर शे बाबु , मो अशरफ खान ,शे चांद पाशा ,शेख आसीफ शे रहमत यांच्या घरांचे नुकसान झाले परंतु त्यांचे सर्वेक्षण झाले नाही निदर्शनात आले. सर्वे न झालेले अनेक उर्वरित घरांची पाहणी करून नुकसानीचे आढावा घेऊन सर्वेक्षण करून त्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याच्या मागणी चे निवेदन तहसीलदार यांना आज देण्यात आले.

निवेदन देतांना अतिवृष्टीने नुकसान झालेले सवेरा कॉलनी ,रहीम नगर , इंदीरा नगर चे नागरिक महिला पुरुषा सह राष्ट्रवादी च्या वनीता ताई चव्हण एमपीजे या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते रेखा ताई गायकवाड ,डॉ फारूक अबरार , मोहसीन राज , इरफान खान , सैय्याद रजा , जहीर मंसुरी , कलीम राज , समीर मुस्तफा सह असंख्य महिला सहभागी होत्या.



