
✍🏻 करण भरणे सर (ढाणकी बिटरगाव विशेष प्रतिनिधी)

ढाणकी (दिनांक 29 ऑगस्ट) गणेश उत्सव म्हणजे ढाणकी शहरातील अबालवृद्ध, लहान्या पासून मोठ्या पर्यंत आनंदाने सहभागी होतात. घरो,घरी गणपती बापाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. याप्रमाणे सार्वजनिक गणेश मंडळ सुद्धा गणपती बापाला चौका, चौकात विराजमान करून दहा दिवस मोठ्या भक्ती भावाने पूजा आरती केल्या जाते. गणेश स्थापने पासून ते विसर्जन मिरणुकी पर्यंत पोलीस बांधवावर खूप ताण पाहण्यास येतो.

मागील वर्षी ढाणकी शहरात गणेश विसर्जन वेळी गाल बोट लागल्याने पोलीस विभागा विषयी गणेश भक्त, ढाणकीकराणी नाराजी दर्शवली होती.मागील वर्षी प्रमाणे गणेश उत्साह निमित्त गालबोट लागू नये म्हणून नागरिकांनी पोलीस प्रशासणाला सूचना केली नागरिकांनी, गणेश भक्तांनी केलेली सूचना गांभीर्याने घेतली.

ढाणकी शहरातील गणेश स्थापना मिरवणूक ही शांततेत पार पाडवी म्हणून पोलीस विभागा तर्फे कलम 163 भारतीय नागरिक सुरक्षा संहीता प्रमाणे ढाणकी शहरातील पूर्वी गुन्हे दाखल असलेले 78 आरोपी यांना मिरवणुकीत सहभागाची बंदी घालून त्यांना नोटीस बजावण्यात आली. परंतु पोलीस विभागाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत 8 जणांनी गणेश स्थापना दि. 27/08/2025 रोजी गणेश स्थापना मिरवणूक मिरवणूक व शहरामध्ये मिळून आले त्यांनी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे आदेशाचे उललंघन केल्याने त्यांचेवर कलम 223 भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी सांगितले.

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस विभागाने नोटीस बजावलेला कोणी आढळून आल्यास त्याच्यावर सुद्धा कार्यवाही करण्यात येणार. गणेश स्थापना मिरवणूक शांततेत झाली पाहिजे म्हणून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मनवर, बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमावर, बिट जमादार मोहन चाट, बिटजमादार रवी गिते, बिटजमादार रोशन सरनाईक, पोलीस शिपाई प्रकाश मुंडे, शरद चव्हाण यासह इतर पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त केला.



