
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 29 ऑगस्ट) तालुक्यातील धनज गावात गेल्या अनेक दिवसापासून खुलेआम दारूची अवैध विक्री सुरू आहेत. ज्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे,वारंवार मागणी करूनही दारूबंदी होत नसल्याने आज संतप्त झालेल्या गावातील महिलांनी गावामध्ये मटका बंद झालाच पाहिजे..! अशा घोषणा देत गुरु पाडणाऱ्याच्या घरी जाऊन दारू बंद झाली पाहिजे अशा घोषणा देत संपूर्ण गावात मध्ये फेरी मारून ग्रामसभेचा ठराव घेऊन ठाणेदार पंकज दाभाडे यांना निवेदन दिले.

महिलांनी पोफाळी पोलीस स्टेशनच्या कार्यालयात जाऊन या धंद्यांना आळा घालण्याची मागणी केली. कुटुंबातील करता पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिलांना व लहान मुलांना त्रास होत आहे. तसेच विद्यार्थी व तरुणाई देखील दारूच्या व्यसनाला बळी पडत आहेत.

या अवैध धंद्याच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून गावातील 100 महिला व मोठ्या प्रमाणात पुरुष मंडळी पोलीस ठाण्यात आले व आमच्या येथील दारू बंद करा..! अशी मागणी यावेळी ठाणेदार पंकज दाभाडे यांना विनवणी केली निवेदन करण्यात आले,

व गावात दारू सहज उपलब्ध असल्यामुळे गावातील शांतता भंग होऊन गरीब व मध्यमवर्गीयांचे संसाराचा आर्थिक बजेट विस्कळीत होऊन महिलांना कुटुंबाचा भार चालवणे कठीण झाले आहे. सदर अवैध दारू विक्री व प्रतिबंध करून अवैध दारू विक्रीची पाळेमुळे शोधून संबंधितांना कडक शासन कारवाई व्हावी असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी गावच्या सरपंच वनिताताई देवानंद पाचपुते ,पोलीस पाटील बापूराव धनवे, तंटामुक्ती अध्यक्ष राघो गायकवाड, उपाध्यक्ष सयाबाई व्यवहारे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अण्णाजी बोंबले, एडवोकेट मजर देशमुख, दत्तप्रसाद जाधव, देवानंद पाचपुते, कानिकनाथ गुहाडे, ज्ञानेश्वर राठोड, नामदेव बोंबले, गजानन धनवे,गजानन राठोड, किसन पठाडे,रमेश ढोबळे, रफीक शेख, जावेद शेख,प्रविण ढोबळे,अशिष डोगंरे, विनोद राठोड,मिथुन राठोड, पंडीत चव्हाण,अंकुश बोबंले, विष्णु चव्हाण, विरेन डोगंरे, राहुल व्यवहारे गावातील महिला व गावकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




