
🔴(मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ चा महत्वपूर्ण निकाल)

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक मो.9823995466
उमरखेड (दिनांक 30 ऑगस्ट) तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची व मोठी समजली जाणाऱ्या बिटरगाव (बु) ग्रामपंचायत च्या सरपंचासह तीन सदस्यांना दि.25,08,2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांचे आदेशाच्या दिनांकापासून आपात्र घोषित करण्यात येत असल्याचे आदेश काढले.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 40(1) (ब) कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी तात्कालीन ग्रामपंचायत सदस्या सरपंच पदी असलेल्या लता प्रताप घोडगे, ग्रां. पं.सदस्या देवकबाई कान्हा तुपेकर, ग्रां पं. सदस्य तानाजी काशीराम तारसेटवाड ह्या तिन्हीही सदस्यांच्या विरोधात अपात्रतेचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

कारण सातत्याने मासिक सभेला गैरहजर असल्याने बिटरगाव ग्रामपंचायतचे सदस्य कोंडबा हौसाजि इंगोले यांनी एकूण पाच ग्रामपंचायत सदस्यावर पिटीशन दाखल केली होती. त्यापैकी विनोद नंदकुमार मामीडवार व बालवंदना अनिल गायकवाड या दोघांना संबंधित न्यायालयाने यापूर्वीच अपात्र घोषित केलेले आहे.

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर ही घटना घडल्याने परिसरातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडालेली आहे. सुरुवातीला माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून पिटीशन दाखल करण्यात आले होते. परंतु सत्ता बदल होऊन लता प्रताप घोडगे सरपंच पदी विराजमान झाल्या.नंतर ग्रामसेवक मोरे साहेबांसोबत संगणमत करून मूळ दस्तऐवज असलेल्या प्रोसिडिंग बुकावर स्वाक्षऱ्या केल्या.

परंतु त्या माहितीच्या अधिकारात प्रमाणित केलेली माहिती व गटविकास अधिकारी उमरखेड यांच्या स्वयंस्पद संबंधित सदस्यांच्या गैरहजेरीचा अहवाल असल्यामुळे न्यायालयाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे याचिका कर्ते कोंडबा हौसाजी इंगोले यांनी मूळ दस्तावेज मध्ये अफरातफर व फेरबदल करून मा. न्यायालयाला हेतूस परस्परपणे सादर करणे, न्यायालयाची दिशाभूल करणे, मूळ रेकॉर्डमध्ये खोटा नाटा बदल करणे ह्या आरोपाखाली पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.

सदरील घटनेमुळे अनेक राजकीय पक्ष व नेत्याकडून कोंडबा इंगोले व प्रकाश पुंजाराम पेंधे ( उपसरपंच ) बिटरगाव यांचे अभिनंदन होत आहे. व त्यावेळी न्यायालयात अतिशय प्रभावी व सक्षमपणे युक्तिवाद करून आकाश वाघ वकील साहेब यवतमाळ यांनी अतिशय कडक बाजू मांडत काम केले.



