
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
लेंडीनाल्याचा पुन्हा प्रकोप निष्क्रीन पालीके ने आता तरी जागे व्हावे..! नागरिका सह एमपीजे ची मागणी आंदोलनाचा ईशारा..!

उमरखेड : काल दि 29 ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे दि. १५-१६ ऑगस्ट रोजी सारखीच परिस्थिती निर्माण होवून उमरखेड शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. विशेषतः फुलारी ले-आऊट, कोकडवार ले-आऊट, रहीम नगर, फातेमा कॉलनी, मुर्तजा नगर या भागांमध्ये घरामध्ये पाणी घुसून जीवनावश्यक वस्तू, घरेलू साहित्य, धान्य व इतर संपत्तीचे आज ही नुकसान झाले आहे.

निसर्गाच्या कृपेने पाऊस लवकरच थांबल्याने मागील वेळ सारखे परिस्थिती निर्माण झाली नाही तसेच जास्त नुकसान झाले नाही. ही परिस्थिती गंभीरच आहे. या वर गांर्भिय पूर्वेक विचार करून उपाय योजना करणे अति आवश्यक झाले आहे.

आज दि 29 ऑगस्ट च्या पावसामुळे पुर्वि पेक्षा थोड्या कमी प्रमाणे भुमापन क्र. 63, 64, 65, 65/1, 66 या सर्वे नंबरवरील मंजूर ले-आऊट मध्ये नाल्याचे पाणी 2 ते 3 फूटपर्यंत जमा झाले होते.शहराच्या पूर्व भागातील ढाणकी रोडवरील लेंडी नाला (जामा मस्जिद ते फुलारी ले-आऊट, लिंगायत मोक्षधाम ते निलपवार ले-आऊट, नांदेड रोडवरील सवेरा कॉलनी, रहीम नगर ते कॅनलपर्यंतचा पट्टा) हा नाला अत्यंत अरुंद, उथळ असून दुतर्फा तटरक्षक भिंतींचा अभाव आहे. परिणामी नाल्यातील शेजारील वस्तीतील घरांमध्ये पाणी घुसते.

आज पुन्हा मुख्याधिकारी यांना निवेदन देवून तातडीने तांत्रिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्थळ सर्वेक्षण करून खोलीकरण व रुंदी करन ही कामे प्राधान्याने हाती घेवून त्वरित करावी, जेणेकरून पुढे पाऊस झाल्यास तिसऱ्या वेळेस नागरिकांचे आर्थिक नुकसान व जीविताचा धोका टाळता येईल. तळ रक्षक भितींचे काम शासकीय प्रक्रिये नुसार सुरू करावी अश्या मागणीचे निवेदन देवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

निवेदन देतांना हाफीज अन्सार हुसैनी (तालुका अध्यक्ष), मोहसीन राज (शहराध्यक्ष), इरफान खान ,सैय्यद रजा , ताहेर शेख, डॉ. फारूक अबरार, गजानन भालेराव, तसलीम अहेमद, सय्यद रजा , ताहेर शेख आदि नागरिक उपस्थित होते.




