✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 04 सप्टेंबर) शिक्षक दिवसाचे निमित्त साधून आयोजित ‘नॅशनल आयकॉन अवार्ड 2025’ साठी उमरखेड जि. यवतमाळ येथील चि.ऋषिकेश सदाशिव कदम वय 8 वर्ष यांची निवड झालेली आहे.
कला क्षेत्रात उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करून इंटरनॅशनल लेव्हल आवार्ड ट्रॉफी गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र,द इंडियन आर्ट सोसायटी फिस्ट नॅशनल 2024 तर्फे नॅशनल अवॉर्ड गोल्ड मेडल, भारत आर्ट सोसायटी जेमिनी रॉय आर्ट 2025 तर्फे नॅशनल आर्ट मेरिट अवॉर्ड गोल्ड मेडल व प्रमाणपत्र मिळालेले आहेत.उमरखेड येथील ऋषिकेश सदाशिव कदम यांची – कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबदल “नॅशनल आयकॉन अवार्ड 2025 ” साठी निवड झालेली आहे.

ह्या पुरस्काराचे वितरण येत्या 11 सप्टेंबर 2025 रोजी मलकापूर जि. बुलढाणा येथील भातृ मंडळ, बुलढाणा रोड, मलकापूर येथील हॉलमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तिथे मान्यवरांच्या हस्ते ऋषिकेश सदाशिव कदम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.









