✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो. 9823995466
[राहत क्लीनिक समोर बस थांबा फलकाचे अनावरण; एमपीजे संघटनेच्या प्रयत्नाला यश..!]

उमरखेड :- (दिनांक 05 सप्टेंबर) उमरखेड नांदेड रोड, लगत सवेरा कॉलोनी, फैजान कॉलोनी, रहीमनगर, शहाकॉलोनी, ताजपुरा वार्ड, राजेंद्र प्रसाद वार्ड, डॉ. आंबेडकर वार्ड असे अनेक रहीवासी वार्ड असल्याने बसथांबा नसल्याने प्रवाशांना गैरसोय होत होती.

राहत क्लीनिक – रहीम नगर कडे जाणारा रस्ता या ठिकाणी बस थांब्या साठी आगार प्रमुख व पोलीस निरिक्षक यांना मागणी करण्यात आली होती. प्रवासी थांबा देण्याच्या मागणीला उमरखेड आगाराची हिरवी झेंडी दिली. आज पैगंबर जयंती च्या पावन दिनी त्यांची शिकवण जन सेवेने ईश्वराचे सानिध्य प्राप्त होते.
या प्रेरणेने बस थांब्याच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. राहत क्लीनिक समोर बस थांबा देवुन प्रवासी नागरीकांना सुविधा दिल्या बद्दल आगार व्यवस्थापक व पोलीस निरीक्षकांचे मोमेंट फॉर पीस अँड जस्टीस व नागरिकांनी आभार मानले.


या सामाजिक संघटनेच्या आपली समस्या आपला पुढाकार या मोहीमच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जानून घेवून बस थांब्या साठी प्रयत्न करण्यात आले. फलकाचे अनावरण पोलिस निरिक्षक शंकर पांचाळ,पोलिस निरिक्षक शंकर पांचाळ ,चंद्रकांत आष्टुलकर ,मारोती कागने यांचे हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी नाहीद नवाब , शेख रहीम सवेरा ट्रायव्हल्स , विविध वार्ड चे नागरिका सह एमपीजे चे कार्यकर्ते अध्यक्ष मोहसीन राज , डॉ फारूक अब्रार ,इरफान खान, सय्यद रजा,अब्दुल जहीर मंसूरी, समीर मुस्तफा,गजानन भालेराव, रियाज महबूब ,वसीम पठान ,कलीम राज ,तौफीक राज रहीम राज ,इमरान आलम, मिनाज अहमद ,तस्लीम अहमद ,सैयद इब्राहिम ,जाहिर राज आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



