
💥 (गोपनीय माहितीनुसार असामाजिक तत्वांकडून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड :- आज दिनांक ०९.०९.२०२५ रोजी ईद-ए-मिलाद निमित्त निघणा-या जुलुस संदर्भात सिरत कमेंटी व ईतर मुस्लीम पदाधिकारी यांचेत मतभेद दिसुन आले तसेच मिळालेल्या गोपनिय माहितीचे अनुषंगाने काही असामाजिक तत्वांकडून उमरखेड येथील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा पोहचवून गंभीर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची दाट शक्यता असल्याने सदर कारणास्तव दिनांक ०९.०९.२०२५ रोजी होणा-या ईद-ए-मिलाद जुलुस (मिरवणूक) पुढे ढकलण्यात आली,


असुन सिरत कमेटीशी समन्वय साधुन पुढील तारीख देण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार शंकर पांचाळ यांनी प्रसार माध्यमांना देऊन सिरत कमेटीचे अध्यक्ष शाहदत खान अहमद नूर खान यांना लेख पत्रक देऊन पुढील तारीख ठरविण्याची सांगितले.



