
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड तालुक्यातील धनज – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा धनज येथे शनिवार दि. 20 सप्टेंबर रोजी शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली ही निवड पालकातुन सर्वानुमते करण्यात आली.

समितीच्या अध्यक्षपदी अशोक रंगराव गुव्हाडे, उपाध्यक्षपदी गजानन सुरेश राठोड, सदस्य अँड मजर देशमुख,अमोल उत्तम जोगदंडे, बंडु अमले, साधना देविदास बरगे, सयाबाई गजानन बोंबले, बंडू आमले, सुजाता अविनाश जोगदंडे ,शोभा विष्णु चव्हाण, माया देवी गजानन देवकते,सुभाष झाटे, सुजाता अविनाश जोगदंडे लहानुबाई डुकरे, यांची पालक सभेमधून सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हारी वाळके,उपाध्यक्ष विजय चव्हाण , सरपंच प्रतिनिधी देवानंद पाचपुते ग्रामपंचायत सदस्य ,दिलीप वाळके , राहुल बोंबले,दत्तप्रसाद जाधव, चरण डोंगरे, प्रकाश आमले, तंटामुक्ती अध्यक्ष राघो गायकवाड,फिरोज पठाण,ज्ञानेश्वर राठोड यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली.

या सभेला शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश जोशी ,शिक्षकवृंद गजानन देवकते ,विलास सुरवसे ,राजु पाटील , बालाजी वगळे, अमोल चिंचोलकर, मनोज कटकमवार यांच्या उपस्थितीत सदर समिती गठीत करण्यात आली. यावेळी गावातील पालक वर्ग आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



