
✍️ करण भरणे सर (बिटरगाव ढाणकी प्रतिनिधी)
ढाणकी येथील गुंडेकर क्लासेस चालवणारा शिक्षकाने शिक्षक पेशाला काळिंबा फासत संदेश गुंडेकर ( 27) याने आपल्याच विद्यार्थीनीला वासनेचा शिकार बनून गर्भवती बनवले.

सविस्तर वृत्त असे की, ढाणकीतील गुंडेकर खाजगी ट्युशन मधील शिक्षक आरोपी संदेश गुंडेकर याने पीडितेसी जवळीकता साधून व मेत्री करून वारंवार क्लास रूम मधे शारीरिक संबंध बनवन त्या पीडितेस गर्भवती केले अशा पीडिता याच्या जबाब वरून बिटरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला होता.या दरम्यान पीडिता हिचा उपचार सुरु असताना नांदेड येथील शासकीय हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला.


सदर गुन्ह्यात आरोपी ला भोकर येथून गोपनीय माहिती चे आधारे ताब्यात घेऊन गुन्हात अटक करण्यात आली असून त्यावर अप क्र :-211/2025 कलम 64(2)(f)(i)(m) BNS सहकलम 4,6 पोक्सो लावले असून पुढील तपास पांडुरंग शिंदे ठाणेदार यांचे मार्गदर्शनात पो. उप. नि. सागर अन्नमावर पोका रावसाहेब मस्के हे करत आहेत.



