
(आरोपीला कठोर शासन आणि खटला जलदगती न्यायालयात चालविन्याची केली मागणी)
✍🏻करण भरणे सर (बिटरगाव/ ढाणकी प्रतिनिधी)
ढाणकी:- काल सगळे नवरात्र उत्सवच्या तयारीत असताना वासनांध शिक्षकाच्या अत्याचारामुळे एका 17 वर्षांच्या लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला, आरोपीने त्याच्या ट्युशन च्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर आपल्या वासनेचा बळी बनवत आरोपी शिक्षकाने मागील एक वर्षांपासून तिच्यावर अत्याचार केले आणि जेंव्हा ती गर्भवती राहिली तेंव्हा तिला अघोरी गोळ्या देऊन मृत्यू च्या दारी ढकललं.

या घटनेने समस्त ढाणकीवाशी मधून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ढाणकी शहर कडकडीत बंद करून त्या पीडिताला न्याय देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनात मागणी केली आहे की,आज गावात प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला शिकवण्यासाठी ज्यांच्यावर विश्वास ठेवून लेकीला शिकविण्यासाठी पाठवतात तोच जर विश्वासघात करत असेल तर आम्ही आमच्या लेकरांची सुरक्षा कशी करावी? ही घटना खूप गंभीर असून समाजातील इतर मुलीला शिक्षणापासून विभक्त करणारी आहे.

यामुळे या आरोपीची चौकशी करून याने या मुलीशिवाय इतरही मुली सोबत असेच कृत्य केले की काय याची पडताळणी करून त्यासोबत आणखी कोण आरोपी आहे याचा खोलवर तपास करावे, तसेच सर्व मुलींच्या पालका मध्ये विश्वासाची भावना कायम ठेवणेसाठी आणि आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा.

सदर खटल्या मध्ये विशेष सरकारी वकील म्हणून श्री उज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली यावेळी समस्त ढाणकी वाशी यांनी ढाणकी पोलीस चौकी येथे मोठया प्रमाणात गर्दी केली होती.

चौकट: – या पीडितेला गर्भ निरोधक गोळ्या दिल्या असून ते गोळ्या आरोपीने कुठून आणले याची चौकशी करून त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी. तसेच त्याच्या भावांना सुद्धा यात सहअरोपी करावे.सामाजिक कार्यकर्ते व नागरिक.




