
✍️करण भरणे सर बिटरगाव ढाणकी प्रतिनिधी
ढाणकी:- भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री तसेच भारताचे लोहपुरुष म्हणून उपाधी असलेले सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या ३१ ऑक्टोबर 2025 रोजी जयंती निमित्त पहिल्यांदाच पोलीस स्टेशन बिटरगाव च्या वतीने ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वात

रन फॉर युनिटी मॅरेथॉन चे संविधान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ठाकरे चौक ढाणकी पर्यंत आयोजित करून सदर मॅरेथॉन मध्ये ढाणकीतील सर्व व्यापारी असोसियन चे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, युवा मोहाला समिती सदस्य, पोलीसमित्र सर्व राजकीय पदाधिकारी पत्रकार बांधव,

प्रतिष्ठित नागरिक, योगा गुरुप यांना सहभाग घेण्यासाठी आमंत्रीत करताच पूर्ण ढाणकीकर यांनी संविधान चौक येथे एकत्रित येत या मॅरेथॉन मध्ये दौड घेऊन ढाणकी मध्ये राष्ट्रीय एकता दिनाचा संदेश आणि थीम “एक भारत, श्रेष्ठ भारत” चा संदेश दिला.



