
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
अप नंबर -700/2025 कलम 132,121(2),296,189(2),190,49,281,54BNS. सहकलम,135 महराष्ट्र पोलीस अधिनियन प्रमाणेफिर्यादी:- गजानन माधवराव पोले वय 42 पोलीस हवालदार ब.नं. 299 पोलीस स्टेशन
उमरखेड जि. यवतमाळ मो. नं. 9881245481

आरोपी – 1) रमेश गुलाबसिंग चव्हाण वय 60 वर्षे 2) राहुल आनंदराव मोहीतवार वय 34 वर्षे 3) गुलाबराव शामराव सुर्यवंशी वय 47 वर्षे 4) प्रविण भास्करराव देशपांडे वय 42 5) गजानन कोंडबाराव देशमुख वय 47 वर्षे 6) गोपाल प्रकाश झाडे वय 42 वर्षे 7) अभय गोविंदराव पवार वय 54 वर्षे सर्व रा. उमरखेड 08) प्रियदर्शन गजानन देशमुख वय अं. 17 वर्षे रा. उमरखेड,घटनास्थळ – सारडा पेट्रोल पंपासमोर उमरखेड,घ. ता.वेळ दि. 31/10/2025 चे 20/05 वा. दरम्याण दा.ता. वेळ – दि.01/11/2025 चे 02/46 वा तपास:- पोउपनि गणेश मुंडे पो.स्टे. उमरखेड मोबाईल नंबर – 98340 77989

हकीगत, नमूद घ ता वेळी ठिकाणी यातील फिर्यादी. यांची पो. नि. सा यांनी मा. उपविभागीय दंडाधिकारी साहेब कार्यालय उमरखेड यांचे कडील आदेश क्रमांक सहा. मह. अधि/प्रस्तु-3/ कावी/933/2025 दिनांक 31/10/2025 नुसार भारतीय नागरीक सुरक्षा संहीता 2023 चे कलम 152 नुसार छत्रपती शिवाजी महाराज आश्वारुढ पुतळा कृती समिती उमरखेड यांचे वत्तीने दिनांक 29/09/2025 पासुन उमरखेड शहरातील सारडा पेट्रोलपंपा समोर, गांधी चौक उमरखेड येथील साखळी उपोषनासाठी टाकण्यात आलेले मंडप 24 तासाचे आत हलविणे बाबत पोलीस निरीक्षक पो. स्टे. उमरखेड यांना लेखी आदेश दिल्यामुळे पो. नि. साहेब यांनी संबंधित छत्रपती शिवाजी महाराज आश्वारुढ पुतळा कृती समिती उमरखेड यांचा टाकलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे रोडवर मंडप काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड यांना कळविल्याने त्याचे पथकासोबत माझे सह अधिकारी अमलदार आम्ही पोलीस स्टेशन मधुन 20/05 वा. घटनास्थळी गेलो असता मंडपात उपस्थित असलेले,

छत्रपती शिवाजी महाराज आश्वारुढ पुतळा कृती समिती उमरखेडचे उपोषनकर्ते 1) रमेश गुलाबसिंग चव्हाण वय 60 वर्षे 2) राहुल आनंदराव मोहीतवार वय 34 वर्षे 3) गुलाबराव शामराव सुर्यवंशी वय 47 वर्षे 4) प्रविण भास्करराव देशपांडे वय 42 वर्षे व ईतर 3 ते 4 पदाधिकारी असे हजर होते. त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथकाचे प्रमुख व पो. नि. शंकर पांचाळ साहेब यांनी मा. उपविभागीय अधिकारी साहेब उमरखेड यांचे वरील दिलेल्या आदेशा नुसार तुमचा सदर मंडप हटविणे आहे.

असे सांगितले असता वरील तिन्ही ईसमाने आम्ही मंडप हटवत नाही, तुम्ही जबरदस्तीने मंडप हटविल्यास अख्खा उमरखेड शहर पेटवु अशी चिथावणीखोर व भडकावु भाष्य करुन तेथे जमत चाललेल्या जमावाला चिथावणी देत होते. त्यामुळे पो. नि. सा. यांनी कोणबाही कायदा व सु.सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन आम्हा पो. स्टॉफ ला त्यांना डिटेन करुन पोलीस स्टेशन नेण्याचे आदेशीत केल्याने काही उपस्थित वरील नमुद पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी आदेशाचे पालन करुन त्यांना पोलीस स्टेशनला आनण्यात आले. त्यानंतर सदर ठिकाणी आम्ही व पोलीस अधिकारी कर्मचारी हजर असतांना तेथे मंडप काढत असतांना एक स्विप्ट डिझायर पांढ-या रंगाची कार क्रमांक MH 26 AK 4511 या कारचालकाने सरळ मंडप हटविणा-या लोकांना धक्का लागेल अशी बेदरकारपणे चालवत आणुन उभी केली.

त्या कारमधुन 5) गजानन कोंडबाराव देशमुख वय 47 वर्षे 6) गोपाल प्रकाश झाडे वय 42 वर्षे 7) अभय गोविंदराव पवार वय 54 वर्षे सर्व रा. उमरखेड हे कार मधुन उतरुन बाहेर आले व मिळुन अश्लिल भाषेत “पोलीस वाल्यांच्या मायला झव साले हो आमचा मंडप कसाकाय हटविला थांबा आता गाव पेटवितो, पेट्रोलपंप जाळतो ” असे चिथावणी वक्तव्य करीत असतांना पो. नि.सा. यांनी यातील अभय गोविंदराव पवार यांना तुम्हाला डिटेन करण्यात येते तुम्ही ठाण्यात चला असे म्हटले असता त्यांनी पो. नि. साहेबांचा हात झटकुन दुर होवुन कायदेशिर कामात अडथळा निर्माण केला, तसेच गोपाल प्रकाश झाडे यांना पोउपनि सागर इंगळे साहेब हे डिटेन करून गाडीकडे घेवुन जात असतांना धक्काबुक्की केली व कायदेशिर डिटेन करण्यापासुन बचाव करुन शासकीय कामात अडथळा केला.

त्यावेळी मी गजानन कोंडबाराव देशमुख यांना डिटेन करण्यासाठी हात धरुन घेवुन जात असतांना त्यांचा मुलगा नामे 08) प्रियदर्शन गजानन देशमुख वय अं. 17 वर्षे हा माझ्या जवळ आला तु माझ्या पप्पाला कुठे नेत आहेस हरामखोरा असे म्हणून अश्लील भाषे शिवागीळ करून माझ्या नाकावर बुक्की मारुन नाक फोडले. त्यानंतर माझ्या नाकातुन रक्त वाहु लागले म्हणुन पोलीस अमलदार शिवाजी चंद्रवंशी यांनी मला पोलीस स्टेशनला आणले व मला उपचाराकरीता पोलीस हवालदार सतिष शिंदे यांनी सरकारी दवाखाण्यात नेले व तेथील डॉक्टरांनी माझे प्राथमिक उपचार करुन माराबाबतचे वैद्यकीय अहवाल दिले त्यात माझ्या नाकाला जास्त मार असल्याने मला पुढील उपचार घेणे कामी रेफर केल्यामुळे अगोदर मी पोलीस स्टेशनला परत आलो अशा फिर्यादी रिपोर्ट सदरचा गुन्हा नोंद.



