✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड (दि. 22 डिसेंबर)गो सी गावंडे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर चे विशेष शिबिर दत्त ग्राम नागेश वाडी येथे दिनांक 21 डिसेंबर रोजी प्रारंभ झाले. या विशेष शिबिराचे उद्घाटन दुपारी 2 वाजता मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटनाच्या अध्यक्षीय प्रसंगी प्राचार्यडॉ.माधवराव कदम यांनी विद्यार्थ्यांना मनगट आणि मस्तक हे अशा शिबिराने कणखर व विचारवादी होते असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक तथा पं.स.चे माजी सभापती श्री शामराव सुरोशे ( पाटील) यांच्या हस्ते फित कापून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. श्री शामराव सुरोशे पाटील यांनी याप्रसंगी महाविद्यालयाची सुरुवात ती आजपर्यंतची करून कहाणी आपल्या अश्रू भरीत नयनांनी सांगितली यावेळी सर्व स्वयंसेवक भावूक झाले होते.

सदर कार्यक्रमास नागेशवाडीच्या सरपंच सौ प्रियंकाताई जटाळे उपस्थीत होत्या. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.व्ही .बी .कनवाळे तसेच महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. साधना देशमुख यांनी सुनियोजित नियोजन केले. या उद्घाटन प्रसंगी प्रा. बी. यु .लाभसेटवार. उपप्राचार्य प्रा जी. बी. जाधव पर्यवेक्षक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डी .एस. शिंदे ,प्रा एम .एम. कांबळे ,प्रा यावेळी उपस्थित होते. उद्घाकनिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.जे .सूर्यवंशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्वयंसेविका मानसी कदम हिने केले. खरा तो एकची धर्म या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.



