🚨 सांसद इम्रान प्रतापगडी यांची भव्य सभा गेम चेंजिंग ठरणार असे भाकीत महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल चे खरे ठरले…!
✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड – सार्वत्रिक नगरपरिषद निवडणूक नुकतीच संपन्न झाली असून त्याची मतमोजणी आज संपन्न झाली.यामध्ये उमरखेड जनशक्ती पॅनल यांना मोठे घवघवीत यश प्राप्त झाले आहे. जनशक्ती पॅनल चे 17 उमेदवार निवडून आले,

तर भारतीय जनता पार्टीला पार्टीला नऊ जागावर समाधान मानावे लागले आहे.वास्तविक पाहता जनशक्ती पॅनल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट मिळून पॅनल ची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये सदर पॅनल तेरा प्रभागांमध्ये 26 उमेदवार उभे केले होते व त्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून सौ. तेजश्री संतोष जैन ह्या निवडणूक रिंगणात होत्या.

या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी तेजश्री संतोष जैन ह्या निवडून आल्या असून त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या निधी नितीन भुतडा या निवडणूक रिंगणात होत्या परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. वास्तविक पाहता उमरखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे व भारतीय जनता पार्टीच्या यवतमाळ जिल्हा समन्वयक म्हणून नितीन भुतडा हे कार्यरत आहेत यांना अध्यक्षपदाचा उमेदवार जरी पराभूत झाला असला तरी पण भारतीय जनता पार्टीचे 09 सेवकावर समाधान मानावे लागले आहे.

जनशक्ती पॅनलच्या प्रचारादरम्यान राज्यसभा संसद शाहीर इमरान प्रतापगडी हे उमरखेड येथे आले असता त्यांची उमरखेड मध्ये भव्य सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी मुस्लिम बहुल मतदाराचे मत परिवर्तन करून जनशक्ती पॅनल ला घवघवीत यश मिळवण्याकरिता आपल्या शाहिरीमधून मतदारांना मंत्रमुक्त केले व खरे यशाचे शिल्पकार म्हणून इमरान प्रतापगडी यांच्याकडे पाहिल्या जात आहे. प्रतापगडी यांची सभा गेम चेंजिंग ठरणार असे भाकीत महाराष्ट्र वायरल न्यूज चैनल ने आपल्या बातमीच्या माध्यमातून मांडून प्रसिद्ध केले होते.

जनशक्ती पॅनलच्या विजयी झालेल्या17 उमेदवार त्यामध्ये अहमद गणी,फरजाना सय्यद रहीम, नजेरा परवीन शेख अखिल,मोहम्मद साजिद उल्ला जहागीरदार, सौ रुपाली सुधीर कवाने,गणेश शामराव खंदारे, खंदारे वीरेंद्र यशवंत, काळबांडे कविता राहुल, प्रकाश सयाजी शिकारे, सौ.स्वाती गजेंद्र ठाकरे, सौ.राधा कैलास इंगोले, रासकर गजानन तुकाराम,लाभेकर वैष्णवी सागर,पठाण शबाना फरीन,पठाण वासिफ खान,शेख रसूल शेख वाहेद, कुरेशी जुबेर, शेख समद,मरियम बी सय्यद इब्राहिम तसेच भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार म्हणून रुढे जोशना प्रतीक,इंजिनीयर सुरेंद्र कोटगीरवार,घाडगे वंदना सचिन, प्रशांत हडपकर,मेंढे खुशबू पवन,तीवरंगकर अमोल, गोपाळ मधुकर कलाने, कुबडे करुणा पुंडलिक, भास्कर ज्ञानेश्वर साधू, निवडून आले आहेत. यावेळी जनशक्ती पॅनलच्या तेजश्री संतोष जैन व विजयी उमेदवार यांनी शहरात फटाक्याच्या आतिशबाजीसह भव्य असा जल्लोष निर्माण करण्यात केला.

यामध्ये प्रामुख्याने गोपाल भाऊ अग्रवाल, एडवोकेट संतोष जैन,बाळासाहेब नाईक, नंदू शेठ अग्रवाल,साहेबराव कांबळे,दत्तराव शिंदे यांचे समवेत असंख्य काँग्रेसचे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते प्रामुख्याने या जल्लोषामध्ये सामील होते.



