
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो. 9823995466
करंजी – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे ४२व्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात २३ फेब्रुवारी २०२६ रोजी अमरावती येथे गो . सी. गावंडे महाविद्यालय उमरखेड ची विद्यार्थींनी कु. निकिता पुनेश्वर देवकते बि.ए. तृतिय वर्ष सन २०२४ -२०२५ या शैक्षणिक वर्षात मराठी वाङमयात (मराठी स्नातक) विषयात अमरावती विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकाविला म्हणून .स्व.श्रीमती सरस्वतीबाई आनंदराव राऊत (सुवर्णपदक), विनायक शंकरराव हुड (रौप्यपद), भालचंद्र दामोदर बापट रोख पारितोषिक, यमुनाबाई गोडबोले रोख पारितोषिक देऊन निकिताला सन्मानित करण्यात आले.

अशा या गुणवंत मुलीचा सत्कार सोहळा करंजी येथे २५ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रभाग क्र .२ मध्ये सामाजिक कार्यकर्ते व महिला मंडळ च्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले.

करंजी गावाचा अभिमान म्हणून निकिताचा व त्यांच्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता घुगरे (जेष्ठ कार्यकर्ते) प्रमुख पाहुणे राहुल चंद्रे सर , बापुराव वाढवे ,राहुल गायकवाड (सामाजिक . कार्यकर्ते) कोंडबा राऊत, विठ्ठल सोळंके, गजानन देवसरकर, शे. भिक्कन चाचा जांबुवंतराव घुगरे , माधव घुगरे, गजानन कांबळे, उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी पुढील भावी वाटचालीस सदिच्छा दिल्या . निकिताने आई वडिला नंतर महामानव बाबासाहेब आंबेडकर हे माझे प्रेरणास्थान आहे असे तिने मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेची प्रेरणा मिळावी यशाच शिखर गाठून गरुड झेप घ्यावी प्रेरणा मिळावी याच उद्देशाने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश घुगरे (अध्यक्ष भा बौद्ध महासभा) यांनी केले तर आभार कवी सुमेध घुगरे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चांदुराव घुगरे , ब्रम्हानंद घुगरे, संजय घुगरे , पांडूरंग घुगरे, लक्ष्मीबाई सोळंके, नंदाबाई घुगरे मनकर्णाबाई घुगरे, गोदावरी घुगरे, वैशाली घुगरे प्रभावती घुगरे, कावेरी वाढवे, मंगल घुगरे , शुभांगी घुगरे, पार्वतीबाई घुगरे यांनी अथक परिश्रम घेतले.





