✍️ राहुल पाईकराव (उमरखेड तालुका प्रतिनिधी) मो.8975723211

उमरखेड दि.27 फेब्रु 2026 मराठी भाषा गौरव दिवस या दिनानिमित्त डॉ . बाबासाहेब आंबेडकर त्यांचे योगदान अतिशय अनमोल आहे. त्यांनी प्रबुद्ध भारत, मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता यासारखे मराठी वृत्तपत्राद्वारे समाजातील आवाज अस्पृश्य आणि बहुजनाच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध वाचा फोडली.

डॉ बाबासाहेबांनी मराठी भाषेचा वापर समाजात परिवर्तन आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी केला. तसेच दलित शोषित वर्गाला जागृत करण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे केला. समाजातील वेदना व बंडखोरी प्रकट करण्यासाठी त्यांनीही वृत्तपत्रे सुरू केली. यातून त्यांनी समाजातील विषमतेला लढा दिला.

आणि समतेचा संदेश दिला. त्यांच्या या योगदानामुळे भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून सामाजिक क्रांती व परिवर्तनाची ताकद बनली.





