(दि. 16 एप्रिल रोजी आमरण उपोषण करणार – शामभाऊ धुळे)

यवतमाळ – संदर्भी दि. 26/02/2026 रोजी आपले कार्यालयाला दिलेला अर्ज. दि. 16/04/2026 पासुन आमरण उपोषणास बसत असल्याने शाम माधवराव धुळे, यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष भिमटायगर सेना यांनी निवेदन केले आहे. वरील संदर्भीय विषयानुसार दिनांक 23/02/2026 रोजी आपल्या जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयास तक्रार अर्ज दिला होता. उमरखेड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहे. यामुळे अतिसंवेदनशिल उमरखेड शहरातील परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत आहे. गुटखा, मटका, जुगार मोठ्या प्रमाणात तालुक्यात चालु आहे. त्यातच वाळु माफियाची दादागीरी सुरु झाली आहे.

या संदर्भात 5 ऑगष्ट 2022 ते 11 जुलै 2023 पासुन सतत आवाज उठवीत आहे. परंतु खोटे आश्वासन देऊन पुन्हा नव्या जोमाने शहरातील अवैध धंदे सुरु केले जातात. सध्या आंध्रप्रदेशातून उमरखेड शहरात गुटखा छुप्या मार्गाने पुरविला जात आहे. काही स्थानिक पोलीस त्यांना मदत करीत आहेत.

अशा आशयाचे पुरावे मी देऊ शकतो. गुटखा व मटका चालक गुंड प्रवृत्तीचे असुन ती तक्रार देली म्हणून पोलिसांना हाताशी धरुन माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करु शकतात. गुटखा व व मटका चालकांचे काही पोलिसांचे कॉल डीटेल्स चेक केल्यास यातील ठोस माहिती बाहेर येऊ शकते. यापुर्वी वारंवार तक्रार देऊनही कोणतही कारवाई होत नसल्यामुळे मला उपोषणास बसल्याशिवाय पर्याय उरणार नाही.

तेव्हा दि. 16/04/2026 पासुन उमरखेड शहरातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर मी आमरण उपोषणास बसणार आहे. माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील. असे लेखी निवेदन यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे. अशी माहिती भीम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे यांनी दिली.







