🚨(प्रसिद्ध ढोलकी सम्राट अशोक इंगोले यांचा जाहीर सत्कार;रसिकांची मोठी उपस्थिती)

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड :- येथील सांस्कृतिक क्षेत्राला नवी उभारी देणारा ‘रिदम कराओके क्लब’च्या वतीने आयोजित ढोलकी सोलो सादरीकरण कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. ढोलकीच्या बहारदार तालावर आणि संगीताच्या सुरावटींनी उमरखेडकरांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाला शहरातील संगीतप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे चित्रपट क्षेत्रातील नामवंत लेखक-दिग्दर्शक आनंद शिंदे (बाबा) यांची लाभलेली उपस्थिती. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

यावेळी व्यासपीठावर क्लबचे संचालक संजय मुटकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.ढोलकी सम्राट अशोक इंगोले यांचा गौरवया सोहळ्याचे औचित्य साधून प्रसिद्ध ढोलकी सम्राट अशोक इंगोले यांचा क्लबच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. त्यांच्या बहारदार कलाविष्काराने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. संगीत क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल आणि उत्कृष्ट कलेबद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात आले.

सर्वधर्मीय व सर्वधर्मीय नागरिकांचा सहभागया सांस्कृतिक मेजवानीला उमरखेडमधील शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, व्यापारी, महिला वर्ग आणि विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ श्रोते म्हणून न थांबता, अनेकांनी या सांगीतिक प्रवासात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.”अशा कार्यक्रमांमुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळते आणि शहरातील सांस्कृतिक वातावरण प्रगल्भ होते.

उमरखेडच्या रसिकांचा प्रतिसाद पाहून आनंद वाटला,” असे मत संचालक संजय मुटकुळे यांनी व्यक्त केले.ढोलकीच्या तालावर रंगलेल्या या सोहळ्यामुळे उमरखेडमध्ये पुन्हा एकदा संगीताची लाट पाहायला मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिदम कराओके क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. हा सोहळा संगीतप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने एक संस्मरणीय अनुभव ठरला.






