✍️ राहुल पाईकराव (उमरखेड तालुका प्रतिनिधी) मो.8975723211

उमरखेड – भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, विशाल कायदे पंडित, प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागापूर( रू) येथे फार मोठे उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. दि.14-4-2026 रोज मंगळवार या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विशाल कायदे पंडित, विश्वरत्न, महान समाज सुधारक, राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विश्वाला समता, समानता, न्याय, बंधुता, याचा संदेश दिला त्यांच्या महान कार्यामुळे आज आपण आनंदात जगत आहोत, विश्वरत्न यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळून दिला.

या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुष्पाने, धुपाने पूजन करण्यात आले, त्यानंतर लगेच पंचशील ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तसेच त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर ग्रामसेवक जोगदंड, सरपंच सौ. सुलावती राजाराम डुकरे, पोलीस पाटील सदानंद तोडासे, भगवानराव पाईकराव,ग्रा. स. माधव चंदेवाड अंगणवाडी सेविका सौ शकुंतला वसंत राठोड आशा सेविका सौ जोशना दत्ता राठोड, सौ अरुणाविजय पतंगे,सुशीलाबाई संभाजी ठोके,देवेंद्र वाढवे, मल्हारी काळे,कैलास कदम, सिद्धार्थ कोल्हे, राष्ट्रपाल ठोके, राहुल पाटील, सुनील खंदारे, मोहसीन पठाण (रोजगार सेवक), मेहबूब पठाण, अमोल खिलारे शिवाजी हापसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालय नागापूर (रूपाळा) इथे सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी ग्रामसेवक जोगदंड साहेब ,सरपंच सौ सुलावती राजाराम डुकरे, पोलीस पाटील सदानंद तोडासे, ग्रा. सदस्य, माधवराव चंदेवाड, मोहसीन पठाण (रोजगार सेवक) मेहबूब पठाण (ग्रा.कर्मचारी) आशा सेविका सौ. जोशना दत्ता राठोड इत्यादी सर्व मान्यवर उपस्थित होते.
या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाईकराव-पत्रकार/ग्रा. सदस्य व रोजगार सेवक मोहसीन पठाण यांनी केले.







