✍️ राहुल पाईकराव (उमरखेड तालुका प्रतिनिधी)

उमरखेड – तालुक्यातील नागापूर (रूपाळा) येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी अन्नदान , भव्य रॅली आयोजन विश्वदीप बौद्ध विहार यांच्यातर्फे गावातील सर्वांचे सहकार्यातून हा कार्यक्रम येथील युवक मंडळ दरवर्षी आयोजित करतात. यामध्ये अन्नदान खिचडी व मठ्ठा प्रसाद म्हणून वाटण्यात आला.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य अशा प्रतिमेची रॅली काढण्यात आली ,या कार्यक्रमांमध्ये गावातील मान्यवर ,प्रमुख पाहुणे ,नवयुग, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेऊन आनंदमय वातावरणात संपूर्ण कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून नंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

“जय भीम”या जय घोषात सर्व वातावरण आनंदमय झाले. अशाप्रकारे गावातील सर्व नागरिकांच्या सहभागाने हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरत्या पार पडण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्यामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना, संपादक) संदीप बर्डे, धोंगडे सर, नरवाडे सर, दवणे सर, रिटे साहेब, राजू उबाळे,यांची उपस्थिती लाभली. तसेच गावातील सरपंच सौ. सुलावती राजाराम डुकरे, तंटामुक्ती अध्यक्ष राजू पाटील सुरोशे, संजय कवडे,बाळू राठोड, देवेंद्र वाढवे, संतोष पुरी, कैलास कदम, सिद्धार्थ कोल्हे, मारुती कोल्हे, राष्ट्रपाल ठोके , जयपाल ठोके, राहुल पाटील, भीमराव हापसे, सुनिल खंदारे, प्रल्हाद इटकरे, प्रवीण कांबळे, ओमप्रकाश घोडेकर, गजानन गायकवाड, सौरभ राठोड, इत्यादी तसेच महिला मंडळ सुशीलाबाई संभाजी ठोके, रमाबाई भगवान तपासे, ललिताबाई भगवान पाईकराव, कविता इंगोले, रत्नमालाबाई खिल्लारे,समता कैलास कदम, सयाबाई शिवाजी हापसे, खंदारे मामी, इत्यादी सर्व गावातील मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते.





