(अन्यथा ६ मे रोजी एसडीओ कार्यालयासमोर अनवाणी पायाने उभे राहुन मौन आंदोलन : शहाजी खडसे यांचा इशारा)

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड – यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी हातला शिवारातील शेतकऱ्याच्या शेतातील मुरुमाचे उत्खनन केल्यानंतर शेतात काळी माती टाकून जमीन लेवल करून शेताबाहेर पाणी काढणे या कराराप्रमाणे संबंधित ठेकेदाराने काम केले नसल्याने केलेल्या उत्खननाची बाजारमुल्या प्रमाणे किंमत ठेकेदाराकडून वसूल करून द्यावी, अन्यथा दि 6 मे रोजी उमरखेड उपविभागीय कार्यालयासमोरील खुल्या जागेवर मे हिट वी तमा न बाळगता सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यन्त उभे राहुन मौन आंदोलन करण्याचा इशारा शहाजी खडसे यांनी उपविभागिय अधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे दिला आहे.

वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेमार्गाच्या कामासाठी संबंधित रेल्वे ठेकेदाराने हातला शिवारातील शेत सर्वे नं. 65 क्षेत्र. 4: 86 हे आर या शेतातून मुरूमाचे उत्खनन करून नेण्यात आला. मात्र ठेकेदाराने करारनाम्याप्रमाणे उत्खनन केल्याच्या बदल्यात शेतात काळी माती टाकणे, जमीन लेवल करून शेताबाहेर पाणी काढले जाईल असे ठरलेले असतांना संबंधित ठेकेदार 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री आपला बाडबिस्तर गुंडाळून पसार झाला.

त्याला अडीच महिने होत असतांना शेतातील खरीप हंगाम पेरणीपूर्व तयारी करण्याची सर्वत्र लगबग सुरु असतांना रेल्वे कंपनीच्या ठेकेदाराकडून दगाफटका झाल्याने शेतातून एटीएस मोजणीनुसार एकुण 48 हजार 950 ब्रास मुरुम उत्खननाची बाजार भावाप्रमाणे एकुण 6 कोटी 63 लाख 76 हजार 200 रुपये रक्कम संबंधित ठेकेदाराकडून सातबाराप्रमाणे 4 खातेदारांच्या खात्यात रक्कम जमा करून मिळावी.

अन्यथा दि. 6 मे रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मे हीटची पर्वा न बाळगता अनवानी उभे राहुन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शेतकरी शहाजी खडसे यांनी उपविभागिय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.






