✍🏻करण भरणे सर (ढाणकी बिटरगाव प्रतिनिधी)

ढाणकी (दि. 29 एप्रिल) बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुधाकर माधव कांबळे (वय ४५ वर्षे, रा. खरुस बु., ता. उमरखेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी सुधाकर कांबळे याच्यावर बिटरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, आरोपी हिमायतनगर (जि. नांदेड) येथे लपून बसल्याचे समजले. या माहितीवरून बिटरगाव पोलिसांनी तात्काळ हिमायतनगर परिसरात सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी आणि महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी त्यालान्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात येत आहे.


सदरची कारवाई ठाणेदार पांडुरंग शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय अन्नमावर, रवी गिते, राजू बेलेवार, प्रवीण जाधव यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.






