
✍🏻 सिद्धार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र सुरु राहणार नाही तसेच घरफोडी, चोरी, गुन्हयावर आळा बसावा याकरीता पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना घर फोडी, चोरीच्या गुन्हयाना आळा बसवा करीता अधिस्थान पथकांना रात्रीच्या वेळी नियमित पेट्रोलींग करुन संशयीत इसमावर प्रतिबंधक करावाई करण्याबाबत सुचना देण्याबाबत आदेशित केले होते.


त्याप्रमाणे दिनांक 16/06/2026 रोजी रात्री दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद कडील नमूद अधिकारी व अंमलदार हे उपविभाग पुसद परिसरात पेट्रोलींग करीत असतांना रात्री बस स्थानक, तलाव टेकडी, आठवडी बाजार पुसद या ठिकाणी अंधारात भिंतीच्या आडोशाला आपले अस्तित्व लपवून चोरी अगर घरफोडी करण्याच्या इरादयाने तिन संशयीत इसम नामे-1) शेख सगीर शेख लतीफ वय 19 वर्ष, रा. मुलतानवाडी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागे पुसद ता. पुसद जि. यवतमाळ 2) अजित गोवर्धन राठोड वय 30 वर्ष, रा. पारध ता. पुसद जि. यवतमाळ 3) शेख तौफिक शेख रफिक वय 36 वर्ष, रा. रहेमतनगर आयशा मस्जीद जवळ वसंतनगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्याचे विरुध्द कलम 122 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदया अन्वये पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ / मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.







