
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड – पोलिस स्टेशन हद्दीतील दिनांक १६/०६/२०२६ रोजी शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे अनोळखी आरोपी ४८ तासांत निष्पन्न करून सर्व ०४ आरोपी जेरबंदकरण्यात आले.दिनांक १६/०६/२०२६ रोजी रात्री १९.४० वा. चे दरम्यान यातील जखमी फिर्यादी रमेश गुलाबसिंह चव्हाण वय.६० वर्ष, रा.हनुमान वॉर्ड उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ हे आपले मो.सा. वर आपले राहते घरी जात असताना कोणीतरी ०३ अज्ञात इसमांनी तोंडाला रूमाल बांधून स्कुटी गाडीवरून येवून त्यांना सी.ओ. साहेब यांचे सरकारी बंगल्या जवळ रस्त्यात अडवून लोखंडी रॉड ने पायावर मारून जबर दुखापत केली व चाकू गळयावर मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.


त्यावरून उमरखेड पोलीस स्टेशन येथे त्या अनोळखी इसमां विरूध्द अपराध नंबर ५३७/२०२६ कलम १०९(१), २९६, १२६ (२), ३(५) बी.एन.एस. प्रमाणे दाखल आहे.सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ व अपर पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांनी वेगवेळी पथके तयार केली होती व त्या पथकांना योग्य त्या सुचना दिल्या होत्या,

त्यांनी दिले सुचंना प्रमाणे ठाणेदार श्री. शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वात डी. बी. प्रमूख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस स्टेशन स्टाफ यांनी तात्काळ त्या सुचंनाचे पालन करून अखंडपणे ४८ तास सदर गुन्हयाचे घटनास्थळी तात्काळ भेट देवून पुरावे गोळा केले, इतर तांत्रिक तपास करून गोपनीय माहीती गोळा केली. यातील सर्व आरोपींनी तोंडाला रूमाल बांधलेला होते त्यामुळे त्यांची ओळख पटविणे हे पोलीसांपुढे आव्हान असतांना देखील डी. बी. पथकाने अतिशय कौशल्यपुर्ण रितीने सदर आरोपींची ओळख पटवून ते सर्व आरोपी यवतमाळ येथून तेलंगना राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना मध्यरात्री यशस्वी सापळा कारवाई करून सर्व आरोपी अवधूतवाडी पोलीस स्टेशन हददीतून ताब्यात घेतले.

त्यापैकी दोन आरोपी अल्पवयीन (विधीसंघर्षग्रस्त बालक) असुन बाकी आरोपी नामे १) सय्यद आरीफ उर्फ धार सय्यद युसूफ वय.२७ वर्ष, रा. सचिननगर उमरखेड, २) अहेफाजोद्दीन उर्फ गौसोद्दीन मुज्जुमोददीन काझी वय.२६ वर्ष, रा.सुकळी ता. उमरखेड यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा परवेझ उर्फ लाला सलीम खान रा.उमरखेड याचे सांगण्यावरून केला असल्याचे कबुल केले असुन परवेझ लाला याने सदर आरोपींना पळवून जाण्यासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याप्रमाणे सदर आरोपींची अटक व रिमांड बाबतची कारवाई चालू आहे.

सदरची कारवाई मा. कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. हुनमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, मा. शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक उमरखेड यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. व्यंकट गंगलवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंढे, डी. बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहा. फौजदार मधुकर पवार, पो. हवा. चंदन जाधव, पो.हवा. संदीप ठाकूर, पो. हवा. अतुल तागडे, पो.ना. संतोष राठोड, पो.कॉ. दिगांबर गिते, पो.कॉ. संघशील टेंबरे, पो. कॉ. संदीप जाधव, पो. कॉ. अंकुश दरबस्तेवार सर्व उमरखेड पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.






