🚨•शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना; जीवितहानी टळली!अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न!

✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
उमरखेड: शहरातील पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या अनिल पुरी यांच्या गादी दुकानाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असून यामध्ये दुकानदाराचे सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अनिल पुरी यांच्या गादी कारखान्याला अचानक आग लागली. दुकानात गादी बनवण्याचे साहित्य, यंत्रसामग्री (मशनरी) आणि मोठ्या प्रमाणावर कापूस साठवून ठेवलेला असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले.


या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच उमरखेड नगरपरिषदेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांकडून स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.







