
🚨 एस सी अ ब क ड उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चात हजारो समाज बांधव सामील होणार!

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड – येथे एससी प्रवर्गातील अबकड उपवर्गीकरणाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन दिनांक आठ जुलै 2026 रोजी बुधवारी दुपारी 12 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान येथून हजारो समाज बांधव एकत्र येऊन निघणार आहे. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या सरकारच्या विरोधात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. उमरखेड शहर व तालुक्यातील तमाम बंधू-भगिनी तरुण मंडळी यांनी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे. असे आव्हान यावेळी करण्यात आले.

या मोर्चाचे कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली नसून फक्त संपूर्ण समाज बांधवांच्या वतीने एसी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती उमरखेड तयार करून केले आहे.

या मिटींगला देवानंद पाईकराव, शामभाऊ धुळे, सुधाकरराव लोमटे, नगरसेवक वीरेंद्र खंदारे राहुल काळबांडे, अरविंद धोंगडे, प्रफुल दिवेकर, शुद्धोधन दिवेकर, सिध्दार्थ दिवेकर, मनोज धूळध्वज, धम्मपाल काळबांडे, प्रसेनजीत दिवेकर, गोपाल मुनेश्वर, विनोद इंगोले, संदीप राऊत, प्रसाद खंदारे, विकास खिल्लारे, सुमेध दवणे, अशोक गायकवाड, बबलू भालेराव, सिद्धोधन धोंगडे, विजय हनवते, कथक दवणे, इत्यादी अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







