🛑 आरोपीची पुढील एक वर्षासाठी नागपूर जेल मध्ये रवानगी!) 🚨[उमरखेड पोलीसांचा कारवाईचा धडाका सुरूच]


✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड शहरात भविष्यात होणा-या गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध व्हावा नव्हे त्याचा संपुर्ण बिमोड व्हावा याकरीता पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब, अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे सुचंनाप्रमाणे ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी उमरखेड शहरातील मागील काही वर्षातील रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे अभिलेख तपासून त्याप्रमाणे समाजाच्या शांततेला आणि सुव्यस्थेला वारंवार बाधा निर्माण करणारा सराईत आरोपी शेख शाहरूख शेख फतरू जो समाजात राहण्यास धोकादायक व्यक्ती झाला होता,

त्यामुळे त्याच्याकडून भविष्यात होणा-या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी एम.पी.डी.ए. कायदया अंतर्गत प्रस्ताव तयार करून मा. जिल्हा दंडाधिकारी यांना पाठवून त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करून त्याप्रमाणे योग्य दस्ताऐवज व पुरावे सादर केल्याने आखीर जिल्हा दंडाधिकारी यांनी रेकॉर्डवरील धोकादायक व्यक्ती शेख शाहरूख शेख फतरू वय.२८ वर्ष, रा.उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ याच्या एम.पी.डी.ए.च्या प्रस्तावाला मंजुरी देवून त्याची पुढील एक वर्षाकरीता नागपूर जेलमध्ये रवानगी करण्यात आली.याद्वारे ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यानी जे काही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, जे स्वतःला भाई, डॉन समजतात यांना देखील हा इशाराच दिला आहे, यापुढे देखील याप्रमाणे वारंवार गुन्हे करणा-या धोकादायक व्यक्तीवर एम.पी.डी.ए., म.को.का. व तडीपारीच्या कारवाया चालूच राहणार आहेत त्यामुळे कोणीही गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू नये तसेच काही अमिषापोटी किंवा सोशल मिडीयावर लाईक मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे गुन्हे करू नयेत असा स्पष्ट इशाराच दिला आहे.

सदरची कारवाई मा. कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा.हुनमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनाखाली मा. शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक उमरखेड, स.पो.नि.गंगलवाड, स.पो.नि.रामोड, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहा. फौजदार विजय पतंगे, पो. हवा. चंदन जाधव, पो.शि.निवृत्ती महाळनर, पो.शि. दिगांबर गिते, पो.शि.संघशील टेंबरे सर्व उमरखेड पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.







