✍️ राहुल पाईकराव (उमरखेड तालुका प्रतिनिधी) मो.8975723211

उमरखेड – दिनांक 28 जून 2026 रोज रविवार “राष्ट्रीय प्लस पोलिओ दिवस “नागापूर (रूपाळा) येथील अंगणवाडी केंद्रात राबविण्यात आला. बालकांच्या सुरक्षित तेच्या दृष्टीने आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण अशी मोहीम असलेली राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आले.

या मोहिमेचा मुख्य उद्देश पोलिओ या आजाराला मुळातून नष्ट करणे होय. यामध्ये गावातील लहान बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात आले.

येथील अंगणवाडी सेविका सौ. शकुंतला राठोड यांनी पालकांना त्यांच्या पाल्याची लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आरोग्य कर्मचारी गणेश पवार, राहुल धुमाळे आशा वर्कर सौ कांचन राठोड, जोशना राठोड, मेहबूब ताई यांनी या मोहिमे त मुख्य कार्य बजावले.


त्यामध्ये गावातील पालकांनी सहकार्य करून आपल्या बालकांना अंगणवाणी केंद्रात घेऊन येऊन पोलिओ डोस दिले. अशाप्रकारे आनंदाच्या वातावरणात ,”राष्ट्रीय पोलीस दिवस “राबवण्यात आला.







