
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
मुंबई – SC आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात विधानसभेच्या 27 आमदारांनी मुख्यमंत्री यांना पत्र महोदयांना पत्र देणे ही केवळ राजकीय घटना नसून सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मूळ तत्त्वांवर आघात होऊ नये, अशी भूमिका घेणाऱ्यांना मोठा नैतिक आधार मिळाला आहे..!


या संघर्षात कोण उपवर्गीकरण होऊ नये या बाजूने ठाम उभे राहिले आणि कोण उपवर्गीकरण होऊन गोंधळ निर्माण करण्याचे काम करत होते, हे “बौद्ध” समाजाने ओळखणे आवश्यक आहे. विचारांशी प्रामाणिक राहणाऱ्यांना साथ देणे आणि समाजहिताच्या विरोधात जाणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देणे. आज उपवर्गीकरण व्हावे म्हणून परिषदा भरवत आहेत, सभा घेताहेत, गल्ली बोळात फिरत आहेत.

या लोकांना वेळीच नियंतिक करावे.आजचा मुंबईत होणारा मोर्चा हा केवळ निषेध नसून सामाजिक न्याय, संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांप्रती असलेल्या बांधिलकीचा निर्धार आहे..! आजच्या मोर्चात सर्वांनी सहभागी होण्याचा प्रयत्न करा..!







