
(मा. रवींद्र वाठोरे आणि सौ.सोनाली रवींद्र वाठोरे या पती पत्नी यांनी रक्तदान करून सामाजिक सलोखा कायम राखला)

✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✒️ सिद्धार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 14 जानेवारी) शहरातील सिद्धेश्वर नगर, बोरबन येथील सुमेध बोधी बुद्ध विहार मध्ये रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 14 जानेवारी सकाळी 11 वाजता भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार किसनराव वानखेडे तर उद्घाटक नितिनभाऊ भुतडा (भाजपा जिल्हा समन्वयक यवतमाळ पुसद) हे होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विजयराव खडसे माजी आमदार, विरेंद्र खंदारे, चौर साहेब, डॉ.जगदीश सोनकांबळे, आत्माराम हापसे, राम कांबळे,पत्रकार सिध्दार्थ दिवेकर,गजेंद्र ठाकरे, ॲड.अजय पाईकराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटने शिल्पकार,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

लगेच मान्यवरांचे आयोजन समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी आमदार किसनराव वानखेडे, विजयराव खडसे (माजी आमदार), नितीन भुतडा (भाजपा जिल्हा समन्वयक) यांची आपले मनोगत व्यक्त केले.

(मा. रवींद्र वाठोरे आणि सौ.सोनाली रवींद्र वाठोरे या पती पत्नी यांनी रक्तदान करून सामाजिक सलोखा कायम राखला)
हा कार्यक्रम भीमराव सोनुले (माजी सचिव विहार समिती बोरबन) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता.

या शिबिराचे आयोजक रवींद्रभाऊ वाठोरे मित्र मंडळ, सुमेध बोधी युवा मंडळ नवज्योत दुर्गोत्सव मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड,आकाश लोणकर,अमोल मंडाले,मनोज काळे सर,रत्नदीप पाईकराव, किरण गडदने यांनी केले होते.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्राध्यापक गजानन दामोदर यांनी केले.



