[उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला निवेदनातून मागणी]
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड:- (दिनांक १५ जानेवारी) पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले डोंगरगाव येथे अवैध रेती उत्खनन व गौण खनिज वाहतूकीची गोपनीय माहिती प्रशासनाला देत असल्याच्या कारणावरून येथील दोघांनी पत्रकारास बंदुकीने उडवून देऊ अशी जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सदर धमकी देणाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करा.

अशा आशयाची निवेदन तालुक्यातील पत्रकारांनी दि.१५ जानेवारी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना निवेदन दिले आहे.महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे अवैध प्रमाणात रेती उत्खनन सुरू असून याबाबतची माहिती प्रशासनाला का देतो.

या कारणावरून येथील पत्रकार प्रशांत देशमुख यांना बंदुकीने उडवून जीवाने मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सय्यद मोसिन सय्यद रऊफ व सय्यद मुजबीर सय्यद जमील यांच्यावर पोफळी पोलीस स्टेशन यांनी गुन्हे दाखल केले असून अद्यापही त्यांना अटक होऊन जामीन झाला असून त्याच्यांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करा असे निवेदनातून म्हटले आहे.

डोंगरगाव येथे अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू असून महसूल व पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत का ? या गावात गेल्या काही वर्षात देशी कट्टे मिळणे, देशी कट्टे हातात घेऊन दहशत निर्माण करणे असे प्रकार यापूर्वी सुद्धा घडले असून यामध्ये पुसद येथील स्थानिक गुन्हे शाखेने कारवाही सुद्धा केली आहे.

असे प्रमाण घडले असतानाही सदरील आरोपींना कायद्याचे धाक नसल्यामुळे अवैध धंद्याच्या माध्यमातून गावांमध्ये दहशत निर्माण करून व तेथील पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देऊन गावात एका प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रकार तेथील गावगुंड करीत असून तेथील दहशत कमी करावी.

असे आशयाचे निवेदन तालुक्यातील पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिले आहे व त्यांच्यावर कठोरपणे व पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी.

अशा आशयाचे निवेदन दिले आहे यावेळी तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व पत्रकार उपस्थित होते.



