✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड (दिनांक ४ ऑक्टोंबर) ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव सोहळा व चक्रवर्ती सम्राट अशोक विजयादशमी महोत्सव २०२५ शाहिद भगतसिंग वार्ड उमरखेड येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समितीचे अध्यक्ष सौ.रेखा विलास गवळे यांचा पुढाकारातून ६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन डीजे मुक्त करून पारंपारिक वाद्यसह साजरा करण्यात आला.


सदर बाबीची पोलीस विभागाकडून दखल घेत यवतमाळ जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांच्या हस्ते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड व उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री शंकर पांचाळ यांच्या उपस्थितीमध्ये शाहिद भगतसिंग वार्ड मधील धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समितीचे अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


सदर मिरवणूक ही अतिशय शांततेत कोणतेही प्रकाराचे गालबोट न लागता, तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या कायद्याच्या चौकटीत राहून आनंदोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.


सदर मिरवणूक रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ तरुण मंडळी व बालक बालिका मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.सदर रॅलीला पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.







